मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Anant Ambani | गुजरातमधील जामनगर येथे मोठ्या उत्साहात भव्य दिव्य असा अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व सोहळा पार पडला. जगभरातील दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग इव्हेंटसाठी बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटू आणि उद्योग जगतातील नामांकितांची मांदियाळी होती. 1 मार्च ते 3 मार्च असा तीन दिवस हा विवाहपूर्व सोहळा पार पडला. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनंत अंबानी यांनी भाषण केले. त्यांच्या हृदयस्पर्शी भाषणाने बापमाणूस मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले.

मुलगा अनंत अंबानी यांचे भाषण ऐकून रिलायन्सचे चेअरपर्सन मुकेश अंबानी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कार्यक्रमादरम्यान अनंत यांनी हा सुंदर क्षण निर्माण केल्याबद्दल त्यांच्या पालकांचे आभार मानले. लहानपणापासून मला कोणत्या ना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. पण असे असताना देखील माझ्या पालकांनी सतत माझी काळजी घेतली, असे यावेळी अनंत यांनी सांगितले.

मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

अनंत अंबानी म्हणाले की, माझे आयुष्य पूर्णपणे गुलाबाच्या बागेप्रमाणे राहिले नाही. काट्यांचा त्रासही मी सहन केला आहे. मला लहानपणापासूनच आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे, पण माझ्या वडिलांनी आणि आईने मला कधीच असे भासू दिले नाही की मला काही समस्या आहे. ते नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. अनंत यांचे हे शब्द ऐकताच मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले. कोणत्याही वडिलांसाठी हा भावनिक क्षण असतो असेच काहीसे त्यांच्या बाबतीत पाहायला मिळाले.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याची सुरुवात मागील आठवड्याच्या सुरुवातीला सामुदायिक जेवणाने झाली जिथे शेजारच्या गावातील हजारो लोकांना मेजवानी दिली गेली आणि गुजराती जेवण दिले गेले. जामनगरमधील तीन दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांसारख्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींसह 1 हजारहून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

Anant Ambani यांचे हृदयस्पर्शी भाषण

या दिमाखदार सोहळ्यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमिर खान यांसारखे बॉलिवूडचे सुपरस्टारही सहभागी झाले होते. क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी देखील जामनगरमध्ये उपस्थित होते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत असलेला किरॉन पोलार्ड या सोहळ्यासाठी खास भारतात आला. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, झहीर खान, हार्दिक पांड्या, ड्वेन ब्राव्हो, ट्रेन्ट बोल्ट, महेंद्रसिंग धोनी, निकोलस पूरन, टीम डेव्हिड हे खेळाडूही दिसले.

दरम्यान, या खास प्रसंगी लोकप्रिय गायिका रिहानानेही शुक्रवारी भारतात प्रथमच परफॉर्म केले. ‘डायमंड्स’, ‘रुड बॉय’, ‘पोर इट अप’ सारखी तिची काही हिट गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

News Title- Anant Ambani speech in pre wedding celebration and Mukesh Ambani burst into tears

महत्त्वाच्या बातम्या –

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

लोकसभेचे तिकिट मिळताच भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; खासदाराची पोलिसात धाव

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर