कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Summer Heat Wave | उन्हाळा म्हटलं की नुसत्या घामाच्या धारा आणि तळपता सूर्य असं चित्र डोळ्यासमोर येतं. सध्या मेचा महिना सुरू असून तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.

त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आता तुम्ही जर कडक उन्हातून घरी आल्याबरोबर या चुका करत असाल तर, आत्ताच सावध व्हा. कडक उन्हातून घरी आल्यावर कधीच पाणी पिऊ नये, तसंच एसीत बसू नये. या लेखात याबाबत सविस्तर सांगितलं आहे.

‘या’ चुका टाळा

लगेच एसीमध्ये बसू नका : उन्हातून घरी आल्यावर लगेच एसीमध्ये अजिबात जाऊ नका. त्यापेक्षा काही वेळ फक्त पंख्याची हवा घ्या. कारण, त्यावेळी तुमच्या शरीराचे तापमान वाढलेले असते. लगेच एसीत गेल्याने नुकसान होऊ शकते.

लगेच कपडे बदलू नका : कडक उन्हातून घरी परतल्यावर लगेच कपडे बदलून अंघोळ करण्याची चूक करू नका. त्यापेक्षा पाच ते दहा मिनिटे कपडे सैल सोडून हवेत श्वास घ्या.

लगेच आंघोळ करू नका : उन्हातून आल्यानंतर (Summer Heat Wave) लगेच थंड पाणी अंगावर घेऊ नका किंवा लगेच आंघोळ करू नका. यामुळे उष्माघाताचा धोका संभवतो. कडक उन्हामुळे थेट थंड पाणी अंगावर टाकल्यास स्नायूंमध्ये जडपणा येऊ शकतो.

थंड पाणी पिऊ नका : उन्हाळ्यात तहान फार लागते.अशात कडक उन्हामुळे घसा कोरडा होऊ शकतो. पण घरी परतताच थंड पाणी पिऊ नका. शरीराचे तापमान सामान्य झाल्यानंतरच सामान्य तापमानात ठेवलेले पाणी प्या. शक्यतो माठामधीलच पाणी प्या.

हलके कपडे घाला : खूप दाट आणि गडद रंगाचे कपडे उन्हाळ्यात घालू नका. यामुळे शरीराची उष्णता वाढते. घरी आल्यानंतर हलके, सुती आणि श्वास घेण्यासारखे कपडे घाला. जेणेकरून शरीराला हवा मिळेल आणि थंडावा जाणवेल.

विश्रांती घ्या : ऊन आणि उष्णतेमुळे (Summer Heat Wave) शरीर पूर्णपणे थकल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे थकवा दूर करून काही काळ विश्रांती घ्या.यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवणार नाही. तुम्हाला खूपच थकवा जाणवला तर तुम्ही थंड पेय पिऊ शकता.

News Title- Summer Heat Wave Dont make these mistakes

महत्त्वाच्या बातम्या –

‘या वयात साहेबांना सोडायला नको होतं’; काय म्हणाले अजित पवार?

‘थॅंक्स टू गद्दार लोक्स’; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

“भाजपला मतदान करा”; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शेकापचं अस्तित्व धोक्यात?; जयंत पाटलांमुळे पक्षाला गळती

“चित्राबाई पॉर्न बघत असतील, आक्रस्थळी बाईने…”, अंधारेंचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर