‘थॅंक्स टू गद्दार लोक्स’; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Mane | अभिनेता किरण माने सतत काही न काही कारणांमुळे चर्चेत राहत असतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापासून तर ते अधिक अॅक्टिव झाले आहेत. बऱ्याचदा ते राजकीय मत देखील मांडत असतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण माने यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

किरण माने हे ठाकरे गटाकडून जोरदार प्रचार करत आहेत. त्यांनी नुकतीच महाविकास आघाडीचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत किरण माने यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांची सभेची पोस्ट सध्या तूफान व्हायरल होत आहे.

किरम माने यांची पोस्ट चर्चेत

तडफदार, डॅशिंग, लढवय्या मर्दमराठा शशिकांत शिंदे यांची सभा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मी भिरकीट करुन टाकली. ‘किरणजी, सायगावच्या सभेला या. तुतारी वाजवूया जोशात.” शशिकांत शिंदेसाहेबांचा फोन आला आणि मी लगेच गेलो. लै जबराट, भन्नाट, नादखुळा झाली सभा.

जावलीचा सुपुत्र संसदेत पाठवायचाच, असा विडाच उचललाय सर्वसामान्य जनतेनं.मला मात्र जाईल तिथं ‘येडं पोरगंबी सांगतंय राव कुनाची हाय शिवसेना’ हे गाणं गायचा आग्रह होतोच.लोकांच्या मनातले शब्द आहेत ते. उद्धवजी आणि पवारसाहेब रयतेच्या काळजाचा विषय होऊन बसलेत. थॅंक्स टू गद्दार लोक्स. लब्यू, अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी केली आहे.

साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे सामना

दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली. “मोदी गॅरंटी फसवी आहे.भाजपचे सर्वत्र जुमले सुरू आहेत. देशात अराजकता माजली आहे. सध्या सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. मान गादीला;पण मत तुतारीलाच देण्यासाठी जनता सरसावली आहे.”, असं राजेश टोपे म्हणाले.

साताऱ्यात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांना महायुतीकडून भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचं आव्हान असणार आहे. सध्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन्ही नेत्यांसाठी सभा घेतल्या जात आहेत.

News Title- Kiran Mane Criticism on Mahayuthi Alliance

महत्त्वाच्या बातम्या –

बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक; म्हणाले…

‘तो जिवंत आहे’; सिद्धू मुसेवाला प्रकरणी पोलिसांचा खुलासा

‘आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…; उद्धव ठाकरे संतापले

‘या’ तीन बँका करतील मालामाल; एका वर्षाच्या FD वर देतात तगडं व्याज

मान्सूनमध्ये मुंबईवर भरतीचं सावट, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा