मान्सूनमध्ये मुंबईवर भरतीचं सावट, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Mansoon | मुंबई शहराला लागूनच अरबी समुद्र आहे. पर्यटकांना हे पाहायला फार भारी वाटतं मात्र मान्सूनमध्ये मुंबईकर आपला जीव मुठीत धरून जगत असतात. मान्सूनमध्ये मुंबईकरांचा अर्धा जीव कासावीस होऊन जातो. तर दुसरीकडे लागून असलेला अरबी समुद्र कधी खवळेल याचा नेम नाही. यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईला हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. (Mumbai Mansoon)

मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रामुळे यंदा भरतीची शक्यता दरवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. मुंबईकरांना सतर्कतेचा (Mumbai Mansoon) इशारा असणार आहे. दरम्यान एप्रिल ते जून महिन्यापर्यंत परिस्थिती साधारण असेल. मात्र जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत भरतीचं सावट येणार असल्याचं सांगितलं जातंय. ही भरती 4.84 मीटरपेक्षा अधिक येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई शहराच्या काही सखल भागात पाणी साचणार असल्याची शक्यता आहे. (Mumbai Mansoon)

जून महिन्यामध्ये 4.5 मीटर भरती येणार असल्याची चिन्हे आहेत. जुलैमध्ये चार दिवस, ऑगस्टमध्ये असे पाच दिवस आणि सप्टेंबरमध्ये सहा दिवस अशी भरती येणार आहे. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 1:03 वाजता 4.84 मीटरपर्यंत भरतीची शक्यता वर्तवण्यात येतेय. (Mumbai Mansoon)

जूनमध्ये भरतीचे प्रमाण

5 जून 11: 17 वाजता 4.61 मीटर, 6 जून 12:05 वाजता 4.69 मीटर, 7 जून 12:50 वाजता 4.67 मीटर, 8 जून 01:34 वाजता 4.58 मीटर, 23 जून 01:09 वाजता 4.51 मीटर, 24 जून 01: 53 वाजता 4.54 मीटर भरतीचे प्रमाण आहे.

22 जुलैला दुपारी 12.50 वाजता भरती 4.59 मीटर असेल, 23 जुलैला दुपारी  1:29 वाजता भरती 4.69 मीटर असेल, 24 जुलैला दुपारी 2:11 वाजता भरती 4.72 मीटर असण्याची शक्यता आहे. 25 जुलैला दुपारी 2:51 वाजता भरती 4.64 मीटर भरतीचे प्रमाण आहे.

19 ऑगस्ट सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी 4.51 मीटर भरती असेल. तर 20 ऑगस्टला दुपारी 12:22 वाजता 4.70 मीटर भरती असणार आहे. 21 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 57 वाजता 4.81 मी भरती येणार आहे. 22 ऑगस्ट दुपारी 1:35 वाजता 4.80 मीटर भरतीचे प्रमाण वाढणार आहे.

17 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 14 मिनिटांनी 4.54 मीटर भरती असणार आहे. 18 सप्टेंबरला सकाळी 11:50 वाजता 4.72 मीटर भरती आहे. तर 19 सप्टेंबरला दुपारी 12:19 वाजता 4.69 मीटर भरतीची शक्यता आहे.

News Title – Mumbai Mansoon Arabian Sea Many More Time High Tide Chances In Mansoon Season

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्यानी केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार

‘या’ राशीला मिळणार बक्कळ पैसा; संकटातून सुटका होणार