राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis l सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत.अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Devendra Fadnavis l बाळासाहेबांच हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम शिंदेनी केलं :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांशी प्रतारणा उद्धव ठाकरे करत आहेत. बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव, आदित्य ठाकरे असतील, पण विचारांचे मालक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे विचार, हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने केले असल्याचं ते बोलले आहेत.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर मुंबईत महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील आले नसते. ‘पंचवीस वर्षे मुंबई महापालिका हवी तशी चालवली आहे, तसेच मुंबईला काय दिले? मुंबईतील गिरणी कामगारांना तुम्ही हद्दपार केले आहे. तसेच 70 हजार कोटी बँक ठेवींमध्ये टाकले पण गिरणी कामगारांना घरे देखील दिली नाहीत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे लबाड लांडगे निवडणूक आली की, कोल्हेकुई सुरू करतात

उद्धव ठाकरेंवर फडणवीस यांनी टीका करताना अनेक आरोप केले आहेत. कोरोनाकाळात विकसित राष्ट्रांचा लस घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तो मोदींनी झुगारला आहे. पूर्वी 30 वर्षे भारताला लस देखील मिळत नव्हती. त्यामुळे लसनिर्मिती करू शकणाऱ्या 3 ते 4 देशांमध्ये आज भारत आहे. त्यामुळे उद्धवजी, तुमको मिरची लगी तो मै क्या करू? त्या काळात तुम्ही खिचडी, कफनचोरी करत होते असे टीकास्त्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर सोडले आहे.

त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने विकसित भारताची निर्मिती भाजप करणार आहे. मुंबईत काँक्रीटचे रस्ते तयार झाले असून 50 वर्षे त्याकडे पाहण्याची गरज देखील नाही. मुंबई खड्डेमुक्त तर झाली आहे. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असणार आहे. हे लबाड लांडगे निवडणूक आली की, कोल्हेकुई सुरू करतात,’ असे टीकास्त्र त्यांनी केले आहे.

News Title – Devendra Fadnavis On Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंच टेन्शन वाढलं! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका

‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

MIMच्या माघारीनंतर नगरच्या लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली, विखे पाटलांचे धाबे दणाणले!

भाजपचा उमेदवार निवडून यायला नको, नगरमध्ये MIMच्या उमेदवाराची माघार