राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका

sharad pawar

Sharad pawar l सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी राष्टवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत खळबळजनक टीका केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेमंडळी यांनी भाजपला सज्जड इशारा दिला आहे.

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल पुण्यात आले असता त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी शरद पवार गटाचे नेते अनेक नेते पुढे सरसावले आहेत.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना प्रत्युत्तर दिल आहे. नरेंद्र मोदी हे रात्रंदिवस टीका करत असतात. त्यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला आहे. मात्र नरेंद्र मोदींना 4 जूनच्या मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकता आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राचा आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांकडे आज संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Sharad pawar l भाजप अगदी 200 पार देखील जाणार नाही: जयंत पाटील

जयंत पाटील हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला सुप्रिया सुळे यांना मत देण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे, तुमची मतं तुतारीला मिळतील, असे मी समजत आहे असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर केवळ शरद पवार साहेबांवर बोलणे त्यांच्यावर टीका करणे, याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना काही बोलताच येत नसल्याचं पाटील हणाले आहेत. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची भाषणे ऐकली आहेत. मात्र, विरोधकांवर नाहक टीका करण्याचे काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केले नसल्याचे दिसत आहे. मोदींचा 400 पारचा नारा आता बंद झाला आहे. आता भाजप अगदी 200 पार देखील जाणार नाही. मोदी आणि शाह यांनी मराठी माणसाने तयार केलेले दोन पक्ष फोडले आहेत. याची शिक्षा मराठी माणूस त्यांना मतदानातून देणारच आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

News Title: PM Modi slams Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

MIMच्या माघारीनंतर नगरच्या लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली, विखे पाटलांचे धाबे दणाणले!

भाजपचा उमेदवार निवडून यायला नको, नगरमध्ये MIMच्या उमेदवाराची माघार

गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!; टाटा कंपनीच्या ‘या’ समूहाचा IPO येणार

‘त्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी हा खेळ…’; मोदींची शरद पवारांवर घणाघाती टीका

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .