‘त्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी हा खेळ…’; मोदींची शरद पवारांवर घणाघाती टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात सभा पार पडली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालंय, असं म्हणत नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केलीये.

मोदींची शरद पवारांवर घणाघाती टीका

काही भटके आत्मे आहेत. स्त्रीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती भटकत राहते. ती स्वतःही समाधानी नाही आणि इतरांनाही अस्थिर करत राहते. महाराष्ट्रातील एका नेत्याने हा खेळ 45 वर्षांपूर्वी सुरू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली, असं सांगत नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) शरद पवारांवर बोचरी टीका केलीये.

“स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता”

हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात. एवढेच नाही तर, स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण होते. या भटक्या आत्म्याने 1995 च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि 2019 मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, असं म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे.

2014 आधी भारत मोबाईल आयात करायचा. मोदी सरकार आल्यानंतर भारत आता मोबाईल निर्यात करतो. मेड इन इंडिया चिपही जगभरात निर्यात केली जाणार आहे, असं नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितलं.

देशाला तरुणी पिढीवर विश्वास आहे. भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास आहे. पुण्यातील तरुण बुद्धीमान आहे, येत्या काळात पुणे ऑटोमोबाईल हब बनेल, असा विश्वास नरेंद्र मोदींनी 9Narendra Modi) व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित पवारांचा अत्यंत धक्कादायक दावा, फडणवीसांवर केला गंभीर आरोप

“30 वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गीतेंनी केला नाही”, तटकरेंचं गीतेंना प्रत्युत्तर

UGC NET परीक्षेची तारीख बदलली; आता परीक्षा ‘या’ दिवशी होणार

भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बँक घोटाळा कसा झाला उघड?, मोठी माहिती हाती

राजकारणाचा चिखल!, काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार, भाजपसोबत जाऊन फुलवणार कमळ