भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बँक घोटाळा कसा झाला उघड?, मोठी माहिती हाती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra l देशात मोठं मोठे घोटाळे उघडकीस येत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेतील घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. अशातच हा बँक घोटाळा नेमका कसा घडला आहे उघडकीस आलं आहे.

मलकापूर अर्बन बँकेत कोट्यवधींचा घोटाळा :

छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेत जमिनीचे बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल 9 कोटी रुपये कर्ज काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी अभिषेक जगदीश जयस्वाल आणि अमरीश जगदीश जयस्वाल या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक देखील केली आहे. या दोन्ही आरोपींपैकी अभिषेक जयस्वाल हे भाजपचे पदाधिकारी व जिल्हा बँकेचे संचालक आहेत. या धक्कादायक घटनेनं छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra l यासंदर्भात मोठी माहिती समोर :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील मलकापूर अर्बन बँकेत जमिनीचे बनावट कागदपत्र सादर करत तब्बल नऊ कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरातील समर्थनगर भागातील कोट्यावधीची जमीन विकत देण्यास मूळ मालकाने नकार दिल्यानंतर अभिषेक जयस्वाल यांनी त्याच जमिनीची खोटी कागदपत्रे तयार केल्याची घटना घडली आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस खरेदी खत तयार करून मलकापूर अर्बन बँकेतून 9 कोटी रुपयांचं कर्ज काढलं आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेबाबत आर्थिक गुन्हाशाखेकडून अधिक तपास सुरू आहे.

News Title – Malkapur urban bank fraud Update

महत्त्वाच्या बातम्या –

नागरिकांनो सावधान; घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

बँकेचे कामे उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट!

नरेंद्र मोदींचा रुबाब वाढवणार दिग्विजय पगडी, मुरलीधर मोहोळांनी सांगितली खासियत

अमिरची मुलगी जगतेय सामान्य जीवन; नुपूरच्या घराचा व्हिडीओ व्हायरल