नागरिकांनो सावधान; घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

Heat Wave Guideline l गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता मे महिन्याला सुरवात होण्यापूर्वीच हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात देखील उष्णतेची लाट धडकली आहे. मुंबईमध्ये रविवारी तापमानात पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली आहे, असे असतानाही पुढील काही दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :

– उन्हाळ्यात भरपूर प्यावे. तुम्हाला तहान लागली नसेल तरी देखील वारंवार पाणी प्यावे.
– वाढत्या उष्णतेमुळे प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
– नागरिकांनो घराबाहेर पडल्यावर ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचा ज्यूस प्यावे.
– याशिवाय दररोजच्या आहारात टरबूज, संत्री, द्राक्षे, खरबूज, कोशिंबिर, अननस, काकडी तसेच पालेभाज्यांचा समावेश करा.

– उन्हाळ्यात शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घाला.
– उन्हाळ्यात घराबाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करा.
– सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालावा.
– तुमचे घराबाहेर काम असेल तर ऊन कमी झाल्यावर करावे.

Heat Wave Guideline l या गोष्टी करू नका :

– उन्हाळ्यात दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
– दुपारच्या वेळी बाहेर पडल्यावर जाड वस्तू उचलू नका.
– अनवाणी पायांनी बाहेर पडू नका.
– अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे शक्यतो टाळावा.

– घराभोवती हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
– सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळावे.
– शिळे अन्न खाणे टाळावे.

News Title – Heat Wave Guideline

महत्त्वाच्या बातम्या

बँकेचे कामे उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट!

नरेंद्र मोदींचा रुबाब वाढवणार दिग्विजय पगडी, मुरलीधर मोहोळांनी सांगितली खासियत

अमिरची मुलगी जगतेय सामान्य जीवन; नुपूरच्या घराचा व्हिडीओ व्हायरल

राजकारणात नवा ट्विस्ट! शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता म्हणतोय मी कुठेही जायला तयार