अभिषेकसोबतच्या भांडणावर अखेर ऐश्वर्याचा मोठा खुलासा, म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या ही आपला पती अभिषेक बच्चनपासून दूर असल्याची चर्चा होती. ऐश्वर्या (Aishwarya Rai) नेहमी तिच्या वक्तव्यासाठी तिच्या कामासाठी चर्चेत असते. बॉलिवूडची ग्लॅमरर्स अभिनेत्रींमध्ये तिचं नाव पहिलं आहे. आपल्या विवाहानंतर 2016 मध्ये एका मॅग्जिनला मुलाखत देत असताना ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.

अभिषेकसोबत भांडणं होतात?

एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला अभिषेकसोबत भांडणं होतात का?, असा प्रश्न केला असता त्यावर आता ऐश्वर्याने नवरा बायकोमध्ये भांडण होत नसेल तर जीवन बोरिंग झाल्यासारखं होतं, असं उत्तर ऐश्वर्याने (Aishwarya Rai) दिलं आहे. मुळात हा वाद नव्हताच. मतभेद असू शकतात, असं ऐश्वर्या (Aishwarya Rai) म्हणाली. यावेळी अभिषेक बच्चन म्हणाला की आम्ही एक नियम बनवला होता. आम्ही भांडणं करून कधीच झोपत नाही. जर असं काही झालं तर ते मिटवून एकमेकांची समजूत काढून झोपायचो. (Aishwarya Rai)

“अभिषेक म्हणाला पहिलं मीच सॉरी बोलून…”

महिला कधीच दुसऱ्यांचं ऐकत नाहीत. त्या नेहमी आपलंच खरं ठरवतात. त्यामुळे पहिलं मीच ऐश्वर्याला सॉरी बोलून वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, 2014 मध्ये एका मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्याबाबत धक्कादायक दावा केला होता. मला ऐश्वर्याने बेडरूमधून बाहेर काढलं होतं. मी दोन दिवस हॉलमध्ये झोपलो असल्याचं अभिषेक म्हणाला. त्यामागील त्याने कारण देखील सांगितलं आहे.

अभिषेकला बेडरूममधून बाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हा बेडेरूममधील अवस्था पाहून ऐश्वर्या रागाने लालबुंद झाली. तिला राग न आनावर झाल्याने तिनं मला बेडरूममधून बाहेर काढलं आणि दोन दिवस मला हॉलमध्येच जोपावं लागलं असं अभिषेक म्हणाला.

अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा 2007 मध्ये विवाह झाला आणि ते हनीमूनसाठी डिज्नीलँडला गेले होते. तेव्हाचा किस्सा ऐश्वर्याने सांगितला. विमानात बसल्यानंतर एका प्रवाशाने मिसेस बच्चन अशी हाक मारली तेव्हा मला लग्न झाल्याचा विश्वास मला बसला, असं ऐश्वर्या राय म्हणाली.

News Title – Aishwarya Rai Spoke About Fight With Abhishek Bachchan

महत्त्वाच्या बातम्या

बँकेचे कामे उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट!

नरेंद्र मोदींचा रुबाब वाढवणार दिग्विजय पगडी, मुरलीधर मोहोळांनी सांगितली खासियत

अमिरची मुलगी जगतेय सामान्य जीवन; नुपूरच्या घराचा व्हिडीओ व्हायरल

राजकारणात नवा ट्विस्ट! शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता म्हणतोय मी कुठेही जायला तयार