बँकेचे कामे उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bank Holiday l मे महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत मे महिना सुरू होण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी रविवारसह बँकेला सुट्टी असते. तुम्हीही मे महिन्यात काही कामासाठी बँकेत जाणार असाल तर तुमच्या शहरात बँक बंद आहे का ते एकदा तपासून घेणे गरजेचे आहे.

14 दिवस बँका बंद राहणार :

RBI च्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, मे 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहे. मे महिन्यात महाराष्ट्र दिन, लोकसभा निवडणूक, अक्षय्य तृतीया, बुद्ध पौर्णिमा आदी कारणांमुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत. मात्र सर्व राज्यांसाठी बँक सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. मे महिन्यात कोणत्या राज्यात आणि कोणत्या दिवशी बँका बंद राहणार आहेत ते पाहुयात…

बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही ग्राहक अनेक बँकिंग सेवा वापरू शकतात. तसेच एटीएममध्ये जाऊन ग्राहक पैसे काढू शकतात. याशिवाय तुम्ही नेट बँकिंग आणि UPI च्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करू शकता.

Bank Holiday l मे 2024 मध्ये किती दिवस बँक बंद राहणार :

1 मे 2024- महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकाता, मुंबई आणि नागपूर येथील बँका बंद राहतील.

5 मे 2024- या दिवशी रविवार असल्यामुळे सर्व शहरातील बँका बंद राहतील.

7 मे २०२४- लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा 7 मे रोजी आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या मतदानामुळे अहमदाबाद, भोपाळ, पणजी आणि रायपूरच्या बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही.

8 मे 2024- रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त कोलकाता येथे बँकेला सुट्टी असणार आहे.

10 मे 2024- अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बेंगळुरू बँकांमध्ये कोणताही व्यवसाय होणार नाही.

11 मे 2024- मे महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे या दिवशी देशातील सर्व बँका बंद राहतील.

12 मे 2024- या दिवशी रविवार असल्यामुळे सर्व शहरातील बँका बंद राहतील.

13 मे 2024- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे श्रीनगरमध्ये बँकेला सुट्टी असणार आहे.

16 मे 2024- गंगटोकमध्ये राज्य दिनानिमित्त बँकेला सुट्टी आहे.

19 मे 2024- या दिवशी रविवार असल्यामुळे सर्व शहरातील बँका बंद राहतील.

20 मे 2024- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानामुळे बेलापूर, मुंबई येथे बँका बंद राहतील.

23 मे 2024- बुद्ध पौर्णिमेनिमित्त आगरतळा, ऐझॉल, बेलारपूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, इटानगर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, येथे बँक सुट्टी आहे. शिमला आणि श्रीनगर येथे बँक बंद असणार आहेत.

25 मे 2024- मे महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे या दिवशी बँका बंद राहतील.

26 मे 2024- या दिवशी रविवार असल्यामुळे सर्व शहरातील बँका बंद राहतील.

News Title – Bank Holiday in May 2024

महत्त्वाच्या बातम्या

राजकारणात नवा ट्विस्ट! शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता म्हणतोय मी कुठेही जायला तयार

पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील 10 वर्षात भरपूर काही दिलं- मुरलीधर मोहोळ

या लोकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करावे लागणार नाही; जाणून घ्या तुमचाही समावेश आहे का?

अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका!, त्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका

पैसे आणि बँकांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार; थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?