मावळ | महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. शनिवारी उरण भेट दौरा आणि बाईक रॅलीचं आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आलं होतं. याची सांगता रात्री करंजाडे येथे सभेने झाली. यावेळी बोलताना श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.
“नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचवली”
देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात सुरक्षित राहील आणि देशाचा कारभार कोण चांगल्या पद्धतीने चालवेल यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते पाहता गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचवण्याचे व देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या देशात पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही, असं श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून जम्मू काश्मीरचा प्रश्न निकाली काढला. या आधीचे सरकार तेथील तरुणांना काम देण्याऐवजी 500 रुपये देऊन हातात दगड देत दंगे घडवत होते. तरुणांच्या हाताला मोदी सरकारने काम दिलं, असंही मोदी म्हणालेत.
ब्रिटीशांनी केलेले कायदे बदलून न्याय देण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला, मात्र विरोधक संविधान बदलण्याबाबत भाषा करतात. संविधान कोणीही बदलू शकणार नाही हे माहीत असताना दिशाभूल करतात. ज्यांच्याकडे दाखवण्यासारखे काही नसते, स्वत:ची कामे नसतात ते टीका करतात, असंही बारणेंनी म्हटलंय.
लोकसभेचा या भागाचा प्रतिनिधी म्हणून जिथे जिथे माझी गरज लागेल तेथे तुम्हाला मदत करीन, अशी ग्वाही श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी मतदारांना दिली आहे.
बारणेंना विजयी करा- अतुल पाटील
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावे यासाठी आपण नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनी महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांना विजयी करावे, असं आवाहन ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांनी केलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट!
नरेंद्र मोदींचा रुबाब वाढवणार दिग्विजय पगडी, मुरलीधर मोहोळांनी सांगितली खासियत
अमिरची मुलगी जगतेय सामान्य जीवन; नुपूरच्या घराचा व्हिडीओ व्हायरल
राजकारणात नवा ट्विस्ट! शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता म्हणतोय मी कुठेही जायला तयार
पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील 10 वर्षात भरपूर काही दिलं- मुरलीधर मोहोळ