नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Loksabha | गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक ट्विस्ट घडले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Loksabha) उमेदवारीवरून तिढा कायम होता. मात्र आता नाशिकमधून एक मोठी अपडेट समोर आलीये. (Nashik Loksabha) शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे.

नाशिकच्या गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेत. शांतीगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याची चर्चा होती. आता त्यांनी नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

गेल्या काही दिवसांपासून शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता त्यांनी थेट महायुतीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता राजकारणात ट्विस्ट निर्माण होणार आहे. (Nashik Loksabha)

महाराजांनी महायुतीतून उमेदवारी अर्ज भरला खरा पण अद्यापही महायुतीने नाशिक लोकसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार दिला नसल्याची माहिती आहे. यामुळे आता महाराज महायुतीचे उमेदवार असणार आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

उमेदवारीवर प्रश्न उपस्थित

दरम्यान, शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरीही त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तसेच उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडून द्यावा लागतो. तो एबी फॉर्म जोडून न दिल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. तर याआधी शांतीगिरी महाराजांनी अपक्ष फॉर्म भरला.

News Title – Nashik Loksabha Shantigiri Maharaj Filled Nomination Form For Nashik Loksabha From Shivsena Shinde Group

महत्त्वाच्या बातम्या

अमिरची मुलगी जगतेय सामान्य जीवन; नुपूरच्या घराचा व्हिडीओ व्हायरल

राजकारणात नवा ट्विस्ट! शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता म्हणतोय मी कुठेही जायला तयार

पुण्यासाठी केंद्र सरकारने मागील 10 वर्षात भरपूर काही दिलं- मुरलीधर मोहोळ

या लोकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करावे लागणार नाही; जाणून घ्या तुमचाही समावेश आहे का?

अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका!, त्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका