राजकारणाचा चिखल!, काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार, भाजपसोबत जाऊन फुलवणार कमळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Loksabha Election 2024 | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्याच नाहीतर देशाच्या राजकारणात उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. आधी सूरतमध्ये भाजपने खेळी खेळून निवडणूक बिनविरोध निवडणूक जिंकली. सूरतमधून भाजपचा उमेदवार सोडून इतर काँग्रेस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा भाजपचा बिनविरोध विजय झाला. त्यानंतर इंदौरला अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. (Loksabha Election 2024)

मध्यप्रदेशमध्ये भाजपने आता मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी इंदौरमधील काँग्रेसचा उमेदवार आपल्या बाजूला वळवून घेतला. या उमेदवाराने स्वत:चा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे आता इंदौरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (Loksabha Election 2024)

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. इंदौरचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय बाम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती समोर आलीये. त्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अक्षय बाम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता इंदौर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात नाही. अशा एक माहिती समोर आलीये की काँग्रेसचे उमेदवार अक्षय बाम हे भाजप आमदारासोबत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले होते. (Loksabha Election 2024)

इंदौर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजय लालवावानी यांना तिकीट देण्यात आलं. अक्षय बाम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

इंदौरचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यांच्या नेतृत्वात स्वागत केलं असल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. याचपार्श्वभूमीवर अक्षय बाम यांचा काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. मात्र अक्षय बाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेस नेते संतापले आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. भाजपने सर्व सिमा पार केल्या आहेत, असा दावा मुकेश नायक यांनी केला. (Loksabha Election 2024)

News Title –  Loksabha Election 2024 Congress Indore Loksabha Seat Candidate Akshay Bam Withdraw Form

महत्त्वाच्या बातम्या

अभिषेकसोबतच्या भांडणावर अखेर ऐश्वर्याचा मोठा खुलासा, म्हणाली…

नागरिकांनो सावधान; घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचवली- श्रीरंग बारणे

बँकेचे कामे उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट!