रोहित पवारांचा अत्यंत धक्कादायक दावा, फडणवीसांवर केला गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Madha Loksabha | माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. काही  माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघातून शरद पवार यांनीही निवडणूक लढवली होती. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रणजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात जात तुतारी हातात घेतली. यानंतर आता माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात पडद्यामागे बरंच काही घडताना दिसत आहे.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यासोबत प्रत्येक मतदारसंघात जात प्रचार करताना दिसत आहेत. ते विरोधकांवर टीका करतानाही दिसतात. अशातच आता रोहित पवार यांनी धक्कादायक दावा केला आहे.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मतांसाठी ब्लॅकमेलिंग करत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी एका बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी आहे. अभिजीत पाटलांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचं काम करतो अशी प्रतिक्रिया दिली. यावरून रोहित पवारांनी फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केलीये.

रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

रोहित पवार यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. सध्या ती पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.  रोहित पवार यांनी पोस्टला “हीच राजकीय ब्लॅकमेलिंगची प्रवृत्ती माढा मतदारसंघातले लोक यंदा मातीत गाडणारा आणि भाजपला पाडणार!”,  असं कॅप्शन देत भाजपवर हल्लाबोल केला.

नेमकं काय प्रकरण?

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यावर राज्य सहकारी बँकेने कारवाई केली. त्यामुळे ते अर्थिक कचाट्यात सापडले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर येथे आले होते. त्यावेळी अभिजीत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. विठ्ठल कारखान्याला मदत करण्यावरून देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्याचं पाटलांनी सांगितलं. तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचं अभिजीत पाटील म्हणाले. यावरून रोहित पवारांनी भाजप ब्लॅकमेलिंगचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केलेले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात रंगत निर्माण होणार आहे. महायुती आणि आघाडीने प्रचाराला जोर धरला आहे. तर अजित पवार गटाचे नेते उत्तम जाणकर यांना आपल्या बाजून करण्यात शरद पवार यांना यश आलं आहे. यामुळे उत्तम जानकर धनगर समाजातील अनेक मतं मिळवून देतील अशा चर्चा आहेत. याचा आता धैर्यशील मोहिते पाटील यांना कसा फायदा होईल हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Madha Loksabha  Devednra Fadanvis Blackmailing For Vote Rohit Pawar Statement

महत्त्वाच्या बातम्या

या लोकांना पॅनकार्ड आधारशी लिंक करावे लागणार नाही; जाणून घ्या तुमचाही समावेश आहे का?

अजितदादांच्या मनातील दर्द पुन्हा छलका!, त्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका

पैसे आणि बँकांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार; थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार?

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार