गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!; टाटा कंपनीच्या ‘या’ समूहाचा IPO येणार

Tata Group | टाटा समुहाचे (Tata Group) शेअर सध्या दमदार रिटर्न्स देताना दिसत आहेत. जर आपल्याला टाटाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असल्यास तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे. टाटा टेक्नलॉजीनंतर आता टाटा ग्रुपची (Tata Group) आणखी एक कंपनी IPO आणणार आहे. (Tata Group)

(Tata Group) ही कंपनी टाटा कॅपिटल आहे. टाटा आपल्या कंपनीचा आयपीओ आणणार असल्याची माहिती समोर आलीये. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी येत्या 2025 मध्ये आयपीओ लाँच करणार असल्याची शक्यता आहे. आणखी एक कंपनी पब्लिक इश्यू आणू शकते. टाटाचा आयपीओ 2023 मध्ये आला होता.

हा आयपीओ जवळपास 20 वर्षानंतर पहिल्यांदा आला होता. 2023 मध्ये सर्वाधिक लिस्टिंग होणारी कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स 1,200 रूपये प्रति शेअरवर 140 टक्क्यांच्या प्रीमियमवर लिस्टिंग झालेत. IPO प्राईज बँडचा विचार केल्यास 475 ते 500 रूपये शेअर्स होता. अंतिम शेअरची किंमत ही 500 रूपये निश्चित करण्यात आली.

टाटा समूहाने अधिच तयारीला सुरूवात केलीये. 2024 वर्षाच्या अंतिम टप्प्यामध्ये लिस्टिंग करण्यात येणार असल्याचा टाटा कंपनीचा विचार आहे.

टाटा कंपनी ही टाटा सन्स या कंपनीशी 95 टक्के हिस्सेदारीत जोडली गेलीये. RBI च्या नियमांनुसार टाटा सन्स आणि टाटा कॅपिटल वरच्या स्तरावर आहेत. टाटा कॅपिटलच्या अनलिस्टेड मार्केटमधील शेअरची किंमत 1100 रूपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2023 मध्ये, टाटा समूहाने टाटा टेकचा IPO आणला होता. ज्याला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या IPOच्या गॅपनंतर टाटा ग्रुप येत्या दोन ते तीन वर्षांत अनेक IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

News Title – Tata Group New IPO Will Launch

महत्त्वाच्या बातम्या

मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांची ताकद वाढली

“औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा..”, भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

‘महाराष्ट्राचं दुर्भाग्य राहिलं की…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

ग्लोइंग स्किनसाठी घरीच बनवा व्हिटॅमिन C सीरम; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?