MIMच्या माघारीनंतर नगरच्या लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली, विखे पाटलांचे धाबे दणाणले!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ahmednagar | अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठी घडामोड घडली आहे. नगरमधून MIMची उमेदवारी मिळालेल्या डॉ. परवेज अशरफी यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. एमआयएमकडून त्यांना मिळालेली उमेदवारी चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती, मात्र ही चर्चा औटघटकेचीच ठरली. अशरफी यांनी माघार घेतल्यानं आता नगरच्या (Ahmednagar) लोकसभा निवडणुकीची सारी गणितं बदलली असून भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

नगरमध्ये मुस्लीम मतदारांची मोठी संख्या आहे, त्यामुळे नगरच्या लोकसभा निवडणुकीत ही मतं नेहमीच निर्णायक ठरतात. यावेळी डॉ. परवेज अशरफी यांना एमआयएमनं उमेदवारी जाहीर केली होती. त्यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा देखील झाली होती, मात्र त्यानंतर त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध व्हायला लागल्याचं पहायला मिळालं होतं. डॉ. परवेज अशरफी यांच्यावर अनेक आरोप देखील होऊ लागले होते. या साऱ्या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर डॉ. परवेज अशरफी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

विखे पाटलांचे धाबे दणाणले-

अहमदनगर (Ahmednagar) दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या जोरदार लढाई होणार आहे. या लढाईत डॉ. परवेज अशरफी यांच्या उमेदवारीनं नवा ट्विस्ट निर्माण झाला होता, मुस्लीम समाजाची बहुतांश मतं डॉ. परवेज अशरफी यांच्या पारड्यात जाणार होती, याचा थेट फटका महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना बसला असता, तर भाजपचे सुजय विखे यांचा मार्ग मात्र यामुळे सुकर झाला होता.

मुस्लीम मतांचं विभाजन होणार असल्यानं डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ही चांगलीच गोष्ट होती. मात्र मुस्लीम समाजाच्या ही गोष्ट लक्षात आली. मतांचं विभाजन झाल्याने त्याचा फायदा थेट भाजपच्या उमेदवाराला होणार आहे, तसेच प्रसंगी भाजपचा उमेदवार विजयी सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे हळूहळू डॉ. परवेज अशरफी यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला. त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप देखील होऊ लागले. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. परवेज अशरफी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

निलेश लंके यांना मोठा फायदा-

डॉ. परवेज अशरफी यांनी नेमकी का माघार घेतली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्यानं त्यांची याबाबतची अधिकृत प्रतिक्रिया देखील समोर आलेली नाही, मात्र मुस्लीम समाजाचा वाढता विरोध यामागे असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे डॉ. परवेज अशरफी यांनी माघार घेतल्याचा थेट फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना होणार आहे. भाजपच्या उमेदवाराचा विजय व्हायला नको यासाठी मुस्लीमांनी डॉ. परवेज अशरफी यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, त्यामुळे आता नगरच्या बहुतांश मुस्लीम समाजाची मतं ही निलेश लंके यांच्या पारड्यात पडणार आहेत, त्यामुळे नगरच्या राजकीय आखाड्यात धक्कादायक निकालाची नोंद होऊ शकते.

News Title: Ahmednagar news Sujay Vikhe and Nilesh Lanke

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचा उमेदवार निवडून यायला नको, नगरमध्ये MIMच्या उमेदवाराची माघार

गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!; टाटा कंपनीच्या ‘या’ समूहाचा IPO येणार

‘त्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी हा खेळ…’; मोदींची शरद पवारांवर घणाघाती टीका

रोहित पवारांचा अत्यंत धक्कादायक दावा, फडणवीसांवर केला गंभीर आरोप

“30 वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गीतेंनी केला नाही”, तटकरेंचं गीतेंना प्रत्युत्तर