अमोल कोल्हेंच टेन्शन वाढलं! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur LokSabha l लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रत्येक मतदारसंघात काही ना काही संभ्रम झाल्याचे चित्र दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने सुप्रिया सुळेंच तुतारी हे चिन्ह आणखी एका उमेदवाराला म्हणजेच सोहेल शेख या उमेदवाराला थोडासा बदल करून देण्यात आल्याची घटना घडली आहे.

बारामतीनंतर शिरुरमध्येही तुतारी चिन्हावरुन संभ्रम :

अशातच आता शिरुर मतदारसंघात देखील असाच प्रकार घडला आहे. शिरूर मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेची चिंता काही प्रमाणात का होईना वाढली आहे. तसेच निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख हा तुतारी असाच केला आहे. ट्रम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून बँड वादनात त्याचा समावेश होत असतो. मात्र या ट्रम्पेटचे मराठी भाषेतून भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारीच करण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

शिरुर लोकसभेत तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता दाट शक्यता आहे. मात्र तुतारी चिन्हांवरून जो काही संभ्रम होत आहे याचा फटका अमोल कोल्हेंना बसणार का हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.

Shirur LokSabha l खासदार अमोल कोल्हेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही :

याप्रकरणी शिरूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाकडून मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. विरोधी पक्ष उमेदवाराला म्हणजेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हामध्ये मतदाराची दिशाभूल होणार नाही. परंतु या चिन्हाचा माझ्या उमेदवारीवर फरक पडू शकतो असे मत मनोहर वाडेकर म्हणले आहेत.

याप्रकरणी खासदार अमोल कोल्हेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता अमोल कोल्हे हे देखील बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळेंप्रमाणे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

News Title: Shirur confusion from trumpet sign Aginst amol kolhe

महत्त्वाच्या बातम्या

राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका

‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

MIMच्या माघारीनंतर नगरच्या लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली, विखे पाटलांचे धाबे दणाणले!

भाजपचा उमेदवार निवडून यायला नको, नगरमध्ये MIMच्या उमेदवाराची माघार

गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!; टाटा कंपनीच्या ‘या’ समूहाचा IPO येणार