Covishield लस घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! रक्ताच्या गाठींसह होणार मोठे आजार

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी घेण्यात आलेल्या कोविशिल्ड लसीसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या काळात कोविशिल्ड लसीचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो असा दावा Covishield लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने केला आहे. कंपनीच्या या दाव्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे.

Covishield लसीमुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम :

Covishield लसीमुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचे उघडकीस आले आहे. लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने यासंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. कंपनीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कबूल केले आहे की, कोविड-19 लसीमुळे शरीरातील रक्त गोठण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. मात्र अशा दुष्परिणामांच्या प्रकरणांची संख्या कमी असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीची कोरोना प्रतिबंधात्मक लस कोविशिल्ड आणि वॅक्सजवेरिया या नावाने जगभरात मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेका कोविड लस कोविशिल्ड (Covishield) आणि वॅक्सजवेरिया (Vaxjaveria) ही कोरोना लस विविध नावांनी जगभर विकली गेली आहे. मात्र आता या दुष्परिणामांमुळे अनेकांचं टेन्शन वाढलं आहे.

Cosishield Vaccine l कोविशिल्ड लसीमुळे होऊ शकतो गंभीर आजार :

ज्या नागरिकांनी कोरोना काळात कोविशिल्ड लस घेतली आहे त्याना या लसीमुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लसीमुळे अनेक जणांचा मृत्यू होऊ शकतो तर गंभीर आजार देखील शकतो. कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या लसीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. त्यामुळे या लसी विरोधात अनेक लोकांनी न्यायालयात खटले दाखल केले होते.

जेमी स्कॉटसह इतर रुग्णांमध्ये थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सोबत थ्रोम्बोसिस नावाचा एक दुष्परिणाम कंपनीला दिसून आला आहे. ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीने ब्रिटन उच्च न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये सांगण्यात आले आहे की, या लसीमुळे भविष्यात TTS सारखे दुष्परिणाम होऊ शकतात परंतु याची शक्यता फारच कमी असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

News Title: Cosishield Vaccine Side Effect

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंच टेन्शन वाढलं! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका

‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार

MIMच्या माघारीनंतर नगरच्या लोकसभा निवडणुकीची गणितं बदलली, विखे पाटलांचे धाबे दणाणले!

भाजपचा उमेदवार निवडून यायला नको, नगरमध्ये MIMच्या उमेदवाराची माघार