भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

रियलमी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Realme P1 5G सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने realme P1 5G आणि realme P1 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामधील Realme P1 5G मध्ये कंपनीने हा फोन आधी 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये सादर केला होता. आता या सीरिजमध्ये कंपनीने या फोनचा तिसरा व्हेरिएंट लाँच केला आहे.

Realme च्या नवीन फोनची किंमत काय? :

Realme कंपनीने Realme P1 5G चे 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले आहे. त्यामुळे अधिक रॅमसह हा पर्याय असणार आहे. कंपनीने हा फोन अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Realme P1 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची विक्री किंमत 17,499 रुपये आहे. तुम्ही हा फोन 1000 रुपयांच्या बँक डिस्काउंटवर आणि 500 ​​रुपयांच्या सूटवर देखील खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर हा फोन 15,999 रुपयांना खरेदी करता येईल.

कंपनीने 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह realme P1 5G या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच Realme P1 5G चा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 18,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तसेच हे दोन्ही फोन 2000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत देखील खरेदी केले जाऊ शकतात. डिस्काउंटनंतर, 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. 

Realme p1 5g स्पेसिफिकेशन :

– कंपनी हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 5G चिपसेट सह realme P1 5G ऑफर करते.
– हा फोन 120Hz AMOLED डिस्प्ले, 6.67 इंच फुल HD+ डिस्प्ले सह येत आहे.
– हा फोन 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह येत आहे.
– तुम्ही फोनिक्स रेड आणि पीकॉक ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये फोन खरेदी करू शकता.
– फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी IP54 पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे.
– Realme P1 5G फोन 5000mAh बॅटरी आणि 45W SuperVooc चार्जिंगसह येत आहे.
– हा फोन 50MP + 2MP बॅक आणि 16MP फ्रंट कॅमेरासह येत आहे.

News Title: Realme p1 5g Launched

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ राशीला मिळणार बक्कळ पैसा; संकटातून सुटका होणार

सख्ख्या भावांमध्ये वाद?; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ

‘तो हरणारच’; माजी मंत्र्यांनी लावली 9 लाखांची पैज

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून मोठी अपडेट

“दमदाटी करायची भाषा करणं सोडून द्या नाहीतर…”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा