देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्याने केली नम्रपणे विनंती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadnavis l लोकसभा निवडणुकीचे वारे सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सर्वांच्याच राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस केला मोठा गौप्यस्फोट :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती अशी माहिती त्यांनी मुलाखतीत सांगितली आहे.

‘तुम्ही मु्ख्यमंत्री बना’ असा उद्धव ठाकरेंचा मला फोन आल्यााचा सनसनाटी गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. तसेच फडणवीस म्हणाले की, मात्र त्यावेळी वेळ निघून गेली होती. 2022 ला सत्ता स्थापनेच्या वेळी तुम्ही मुख्यमंत्री बना असे सांगितले.

Devendra Fadnavis l उद्धवजी आता वेळ निघून गेली आहे : देवेंद्र फडणवीस

मात्र आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन देखील आला होता. ते म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पार्टी घेऊन तुमच्याकडे येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळे नीट करु असे उद्धव ठाकरे फडणवीसांना त्यावेळी म्हणाले होते असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.

याशिवाय मिलिंद नार्वेकरांनी देखील फोन लावला होता. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले होते. मी त्यांना म्हणालो, उद्धवजी आता वेळ निघून गेली आहे. आता तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या वरिष्ठांशी चर्चा करा. आता माझ्या पातळीवर हा निर्णय संपलेला आहे. आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बेईमानी करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला की नाही, या विषयी मला काहीही माहिती नाही असे देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवले आहे.

News Title – Devendra Fadnavis On Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार

‘या’ राशीला मिळणार बक्कळ पैसा; संकटातून सुटका होणार

सख्ख्या भावांमध्ये वाद?; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ