‘या’ तीन बँका करतील मालामाल; एका वर्षाच्या FD वर देतात तगडं व्याज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Best Interest Rate | फिक्स्ड डिपॉझिट हा बचत करण्याचा एक अतिशय सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. गुंतवणूकदारांना सर्वात मोठा फायदा म्हणजे एफडी खाते सुरू करण्याआधीच किती व्याजदर आहे, मुदत संपल्यानंतर किती रक्कम मिळेल याची माहिती मिळत असते. त्यामुळे प्रत्येक जण भविष्यासाठी एफडी करत असतो.

एफडी म्हणजेच मुदत ठेवी ही सरकारी, निमसरकारी बँका, खाजगी बँका, पोस्ट ऑफिस आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे दिली जाणारी एक ठेव योजना आहे. या योजनेत निश्चित कालावधीसाठी जमा केलेल्या रकमेवर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज दिले जाते. आता जर तुम्ही बँकेत एफडी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच फायद्याची ठरेल.

आपल्या देशात वेगवेगळ्या बँका एफडीवर वेगवेगळं व्याज देतात. तुम्हाला जर अधिक व्याजदर हवा असेल तर तुम्हाला तीन बँकांचे ऑप्शन आहेत. या तीन बँका तुम्हाला फक्त व्याजातूनच मालामाल करतील. या लेखात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

‘या’ तीन बँका ठरतील बेस्ट ऑप्शन्स

डीसीबी बँक : ही बँक एफडीच्या रुपात गुंतवणुकीचा पर्याय देते. तुम्ही एका वर्षासाठी एफडीच्या रुपात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बँक चांगला ऑप्शन ठरू शकते. ही बँक एका वर्षाच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देते. हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आहे.

तमिळानाड मर्कंटाईल बँक : या बँकेत (Best Interest Rate) देखील तुम्हाला चांगला परतावा मिळेल. ही बँक आपल्या ग्राहकांना एका वर्षाच्या एफडीला 7.25 टक्क्याने व्याज देते. हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आहे.

कॅनरा बँक : ही बँकदेखील एफडीवर ग्राहकांना चांगला परतावा देते. तुम्ही एका वर्षासाठी एफडी करत असाल तर तुम्हाला सात टक्के व्याज मिळेल. ही बँक ज्येष्ठ नागरिकांनादेखील 7.70 टक्के व्याज देते.

News Title –  Best Interest Rate Bank Option for FD

महत्त्वाच्या बातम्या- 

पती-पत्नीमधील प्रेमाचा गोडवा हिरावतील ‘या’ चुका; आत्ताच व्हा सावध

‘नमाज पडणारे काही लोक दलाल आहेत’; ठाकरे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचा ताप वाढणार; कुठं पावसाचा इशारा तर कुठं उष्णतेची लाट कायम

वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर