वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar l गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ‘भटकते आत्मा’ आहेत असे म्हणत खरपूस शब्दात त्यांच्यावर टीका केली होती. मोदींच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना प्रतिउत्तर दिले होते. अशातच आता हा वाद अजून चिघळला असल्याचे दिसत आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले? :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘भटकती आत्मा’वरून शरद पवार यांनी मोदींना उत्तर देताना सांगितले की, हो, मी शेतकरी आणि कामगारांसाठी अस्वस्थ आहे. मात्र आता शरद पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजप नेते नारायण राणे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

यावेळी नारायण राणेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यावेळी राणे म्हणाले की, सध्या वय 84 वर्ष चालू आहे. येत्या 12 डिसेंबरला 85 लागेल, मग तुम्ही कशामुळे अस्वस्थ आहात? एवढी जनतेची आस्था प्रेम आहे तर तुम्ही किती वर्षे सत्तेवर होतात? तसेच केंद्रात मंत्री म्हणून देखील 12 वर्षे होता असे म्हणत नारायण राणेंनी शरद पवारांची वयावरून पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे.

Sharad Pawar l मोदी साहेब भारताला महासत्ता देश बनवणार :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे की, भारत महासत्ता देश बनवेन. देशाला तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जाईल तर मोदीजी कर्तबगारी सिद्ध करत आहेत. अमेरिका, इटली, इस्रायल अशा मोठमोठ्या देशाच्या अध्यक्षांनी देखील मोदींचं कौतुक केलं आहे. कारण मोदींमध्ये प्रशासन हाताळण्याची क्षमता आहे. तसेच ते कर्तृत्वान पुरुष म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणार आहेत अशा शब्दांत नारायण राणेंनी मोदींची स्तुतीसुमने उधळली आहेत.

तसेच शरद पवार हे मोदी साहेबांना उकसवतात. तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जात नाही असे वारंवार बोलून दाखवतात. मात्र आमचं सरकार जाणार नाही. यंदाच्या वर्षी देखील चारशे खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार येणार येणार आहे आणि मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत असं राणे म्हणाले आहेत.

News Title – Narayan Rane Statement On Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्यानी केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार

‘या’ राशीला मिळणार बक्कळ पैसा; संकटातून सुटका होणार