‘आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…; उद्धव ठाकरे संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackrey | कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीकडून कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक उभे राहिले आहेत.

श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर येथे जाहीर सभा घेतली. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांची जाहीर माफी मागितली. यासोबतच त्यांनी एक मोठा खुलासा देखील केलाय.

राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली नव्हती. हाच मुद्दा काढत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आता यांना राजघराण्याचा पुळका का आला?, असा सवाल करत टीका केली. यावरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

संभाजीराजे आणि मी काय निर्णय घेतला होता तो आम्हाला माहिती आहे. आमची मैत्री अजूनही कायम आहे. तुम्ही तेव्हा माझा संजय पाडलात पण तो दगाफटका संभाजीराजे यांच्याबद्दल झाला असता तर? मी संभाजीराजे यांच्याबद्दल चुकलो असेल तर जाहीर माफी मागतो. मात्र तुम्ही आता काय करतायं? आम्ही शेण खाल्ल म्हणुन तुम्ही शेण खाताय?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारून संजय पवार यांना राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं. याच मुद्यावरून भाजपसह शिंदे गट आता महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्री उदय सामंत यांनी यावर बोलूनही दाखवलं. यालाच कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackrey) प्रत्युत्तर देत संभाजीराजे यांची माफी मागितली.

उदय सामंत काय म्हणाले होते?

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संभाजीराजे यांच्याशी बोलणं चालू असतानाच ऐनवेळी संजय पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. संभाजीराजे यांनी अर्ज भरू नये यासाठी त्यांना अडकवून ठेवण्यात आलं होतं. मग त्यांना आता छत्रपती घराण्याचा पुळका का येत आहे?, असा सवाल उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद केला होता.

News Title :  Uddhav Thackrey apologized to Sambhaji Raje

महत्त्वाच्या बातम्या-

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्यानी केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार