‘पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती…’, चित्रा वाघ यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Chitra Wagh | राज्याच्या अनेक भागात लोकसभा निवडणुकीसाठी सभा आयोजित केल्या जात आहेत. सभेत बोलत असताना विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. तसेच सर्व पक्षांनी प्रचारासाठी काही जाहिराती देखील तयार केल्या आहेत. मात्र यावरून सध्या राज्यात वेगळाच गोंधळ सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.

काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीची सगळीकडे जय्यत तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष जाहिरातीच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाने जाहिरात केली आहे. ज्याची राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु आहे. या जाहिरातीमध्ये महिला आत्याचारासबंधी काही प्रश्न उपस्थित केल्याचं पहायला मिळत आहे. मात्र त्यांनी केलेल्या जाहिरातीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोप केले आहेत.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

माध्यमांशी बोलत असताना चित्र वाघ यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, या जाहिरातीमध्ये जी व्यक्ती वडिलांच्या भूमीकेत आहे तिच व्यक्ती उल्लू नावाच्या अॅपवर रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये नको तसले कृत्य करतानाचे व्हिडीओ क्लिप्स आहेत. आणि अशा माणसाला घेऊन तुम्ही महिला अत्याचारावरची जाहिरात केलीच कशी काय?, असा प्रश्न त्यांनी ठाकरे गटाला विचारला.

पुढे त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ते कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहेत? असे बाप जाहिरातीमध्ये वापरून तुम्ही ‘बाप’ असल्याचं महाराष्ट्राला दाखवणार आहात का? असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारत चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्न असा किळसवाणा प्रकार आणला जातोय, त्याबद्दल आम्हाला उद्धव ठाकरेंना जाब विचारायचा आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

पाॅर्नस्टारचा काय संबंध?

एवढंच नाहीतर, त्यांनी जाहिरात करणाऱ्या कंपनीवर देखील निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ज्या कंपनीने ही जाहिरात केली, ही कोणाची कंपनी आहे? त्याचा आणि या पॉर्न स्टारचा काय संबंध आहे? या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे, याचा तपास व्हायला पाहिजे, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

News Title : Chitra Wagh on shivsena Thackeray group

महत्त्वाच्या बातम्या-

‘तो जिवंत आहे’; सिद्धू मुसेवाला प्रकरणी पोलिसांचा खुलासा

‘आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…; उद्धव ठाकरे संतापले

‘या’ तीन बँका करतील मालामाल; एका वर्षाच्या FD वर देतात तगडं व्याज

मान्सूनमध्ये मुंबईवर भरतीचं सावट, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

पती-पत्नीमधील प्रेमाचा गोडवा हिरावतील ‘या’ चुका; आत्ताच व्हा सावध