‘तो जिवंत आहे’; सिद्धू मुसेवाला प्रकरणी पोलिसांचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lawrence Bishnoi | गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धु मुसेवाला गोळीबार प्रकरणी गोल्डी ब्रारचा मोठा हात होता, अशी माहिती समोर आलेली. सिद्धू मुसेवालाला मारण्यासाठी गोल्डी ब्रारने अनेक शुटर्स पाठवले होते. हे स्वत: गोल्डी ब्रारने कबूल केलं होतं. मात्र आता त्याच गोल्डी ब्रारची अमेरिकेच्या भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत आता अमेरिकन पोलिसांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. (Lawrence Bishnoi)

गोल्डी ब्रारवर गोळीबार?

अमेरिकेत गोल्डी ब्रारवर गोळीबार केल्याची चर्चा आहे. अमेरिकन पोलिस गोल्डी ब्रारला सिद्धू मुसेवाला प्रकरणापासून शोधत आहेत. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. आता या प्रकऱणात अमेरिकन पोलिसांनीच गोल्डी ब्रारवर झालेल्या गोळीबाराविषयी गौप्यस्फोट केलाय.

अमेरिकन पोलिसांनी गोल्डीची हत्या केल्याचा दावा खोटा ठरवला आहे. गोल्डीवर केलेल्या गोळीबाराविषयी कोणी अफवा पसरवली हे माहिती नाही. मात्र गोल्डीवर गोळीबार केल्याच्या अनेक बातम्या वृत्तपत्रामध्ये छापून येताना दिसत आहेत. याबाबत पोलिसांनी हत्या झालेला व्यक्ती गोल्डी नसल्याचं सांगितलं. गोल्डी ब्रार जिवंत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

गोल्डी ब्रारला भारत सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. कारण गोल्डी ब्रार हा भारताबाहेर राहून भारतात गुन्हेगारी पसरवण्याचं काम करत आहे. सिद्धू मुसेवालाच्या घरावर गोळीबार केला होता. तेव्हा त्यामध्ये शुटर्स पुरवण्याचं काम गोल्डी ब्रारने केलं होतं. सिद्धूवर गोळीबार प्रकरणी एकच खळबळ उडाली होती. तो लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख असल्याची माहिती समोर आलीये.

गोल्डी ब्रार लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख

गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगचा प्रमुख आहे. तो विदेशात राहून संपूर्ण गँग चालवतो. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगसाठी हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. केवळ गोल्डी ब्रार नाहीतर इतर अनेक लॉरेन्स बिश्नोई गँगचे (Lawrence Bishnoi) सदस्य भारताबाहेर राहून भारतात दहशत माजवत आहेत.

दरम्यान, नुकताच सलमाच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार 14 एप्रिल रोजी करण्यात आला होता. यामागे लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा हात आहे. लॉरेन्स बिश्नोईने याआधी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरच गोळीबार करण्यात आला.

News Title – Lawrence Bishnoi Gang Leader Goldy Brar Murder In America

महत्त्वाच्या बातम्या

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार

‘या’ राशीला मिळणार बक्कळ पैसा; संकटातून सुटका होणार

सख्ख्या भावांमध्ये वाद?; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ

‘तो हरणारच’; माजी मंत्र्यांनी लावली 9 लाखांची पैज