पती-पत्नीमधील प्रेमाचा गोडवा हिरावतील ‘या’ चुका; आत्ताच व्हा सावध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | भारतीय राजकीय विचारवंत, राजकीय तत्वज्ञानी, राजकीय धोरण निर्माता, शिक्षक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर काही न काही तत्वज्ञान सांगितलं आहे.

जीवनात येणाऱ्या अडचणी असो किंवा जीवनात मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, याबाबत त्यांनी काही तत्वे सांगितली आहे. त्यांच्या या तत्वांचे पालन केले तर जीवनातील कोणत्याही अडचणीतून तुम्ही सहजरीत्या बाहेर पडू शकता.

चाणक्य यांनी पती आणि पत्नी यांनी जीवनात कोणत्या चुका करू नाही,याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. तुमच्या नात्यात कटुता निर्माण होईल, अशा 5 चुका कधीच करायला नाही पाहिजे, असं चाणक्य म्हणतात. आता या चुका कोणत्या त्याबाबत या लेखात माहिती दिली आहे. तुम्ही त्या चुका सुधारल्या किंवा टाळल्या तर तुमचं नातं अजूनच बहरत जाईल.

‘या’ चुका नात्यात कटुता आणतील

राग : राग हा माणसाचा शत्रू असतो.बऱ्याचदा व्यक्ती रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतात. रागामुळे चांगल्या गोष्टी बिघडतात. नात्यात जास्त राग केला तर त्यात कटुता निर्माण होते. आपल्या जोडीदाराची चीडचीड होते. यामुळे वाद निर्माण होतात.

अहंकार : नात्यामध्ये कधीच अहंकार नसायला पाहिजे. कारण, यामुळे वाद निर्माण होतात. अहंकार हा सौंदर्याचा, पैशांचा तसंच कोणत्याही गोष्टींचा असू शकतो. तुम्ही जोडीदारासोबत आनंदी जीवन जगू पाहत असं तर तुम्हाला हा अहंकार सोडवा लागेल आणि आपल्या पार्टनरल नेहमी सन्मानाने वागणूक द्यावी लागेल.

खोटे बोलण्याची सवय : खोटे बोलण्याची (Chanakya Niti) सवय सगळ्या गोष्टी बिघडवतेच यासोबतच विश्वासाला देखील तोडते. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत कधीच खोटे बोलू नये. खोटे बोलण्याने तुम्ही नात्यामधील विश्वास गमावून बसता. यामुळे नात्यात कोणत्याच प्रकारचा विश्वास राहत नाही.

घरातील गोष्टी घरातच ठेवा : लोक नेहमी तुमचा तमाशा बघण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे घरातील गोष्टी नेहमी घरातच ठेवा. यामुळे तुमचं कुठे हसू होणार नाही. तुमचे जवळचेच लोक तुमच्याविरोधात कधी तुमच्याच गुपीतांचा वापर करतील, काही सांगता येत नाही. त्यामुळे काही गोष्टी जोडीदाराने स्वतःच सोडवायला हव्यात. त्या बाहेर सांगू नये. यामुळे तुमच्या नात्यात अजूनच गैरसमज देखील निर्माण होऊ शकतात.

नात्यात विश्वास असणे : कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असते. व्यक्तीने (Chanakya Niti) कधीच जोडीदाराला धोका देऊ नये. यामुळे विश्वास उडून जातो. बऱ्याचदा मग घटस्फोटापर्यंत या गोष्टी जातात.त्यामुळे विश्वास टिकून ठेवावा.

News Title – Chanakya Niti dont make these mistakes in married life

महत्त्वाच्या बातम्या-

‘नमाज पडणारे काही लोक दलाल आहेत’; ठाकरे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचा ताप वाढणार; कुठं पावसाचा इशारा तर कुठं उष्णतेची लाट कायम

वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्याने केली नम्रपणे विनंती