‘नमाज पढणारे काही लोक दलाल आहेत’; ठाकरे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

दापोली | रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि आघाडीचे उमेदवार अनंत गीते (Anant Geete) यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. अशात आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने एक वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

“नमाज पढणारे काही लोक दलाल आहेत”

दापोली येथे आयोजित प्रचार सभेत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्याचे पडसाद संपूर्ण राज्यात दिसत आहे. नमाज पडणारे काही लोकं दलाल आहेत, असं वक्तव्य संजय कदम (Sanjay Kadam) यांनी केलं आहे.

इथे नमाज पढणारे काही लोक दलाल आहे. आत्ताच ईद झाली. सगळ्यांनी उपवास धरला. मात्र काही नमाज पडणारे लोकही दलाल आहेत. मात्र जो खरा मुस्लिम आहे, जो नमाज पढतो तो अनंत गीतेंनाच मतदान करेल, असं संजय कदम (Sanjay Kadam) यांनी म्हटलं.

2014 ला रामदास कदमांनी गद्दारी केली. त्यावेळी गीते साहेब निवडून आले. 2019 ला रामदास कदम सोबत होते. मात्र त्यावेळी गीते साहेबांचा पराभव झाला, असं सांगत संजय कदम (Sanjay Kadam) यांनी कदमांवर सडकून टीका केलीये. रामदास कदमांमुळे गीतेंचा पराभव झालेला, असा आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचा ताप वाढणार; कुठं पावसाचा इशारा तर कुठं उष्णतेची लाट कायम

वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्याने केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा