Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षांची सोबत एका क्षणात सोडत बंडखोरी केली. शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून अजित पवार आज भाजप आणि शिंदे गटात सत्तेत सामील झाले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये आता पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यापासून सतत अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली. अगदी त्यांचे मोठे बंधु श्रीनिवास पवार यांनी देखील अजित दादांची या निर्णयात साथ सोडली. त्यांनी शरद पवार यांनाच पाठिंबा दिला. आता बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांविरोधात उभं ठाकलं आहे.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक ही दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. बरेच जण अजित पवार यांना अजूनही म्हणतात की, त्यांनी शरद पवार यांची साथ का सोडली. यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते इंदापूरमध्ये एका प्रचारसभेत बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
“तुम्ही सर्वांनी मला कारखान्याचा डायरेक्टर केलं. मला कधी वाटलं नव्हत की, मी राजकारणात येईन. कारण माझा स्वभाव हा असा आहे. एक घाव दोन तुकडे. एखादं काम होणार असेल तर हो सांगतो, नाही तर नाही सांगतो. मला खूप जणांनी सांगितलेलं की तुम्ही राजकारणात येणार नाही. पण मला लोकांनी प्रेम, पाठिंबा दिला”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
तसंच पुढे ते म्हणाले की, “ही भावकीची निवडणूक नाही. काहीजण म्हणतात की, या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होतं, अशी पारावर चर्चा होते. पण, मी साहेबांना कधी सोडलं नाही.”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“..तेव्हा पवारसाहेबांनी विरोधात काम केलं”
यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला. “मी साधारण 84 साली राजकारणात आलो. 1987 पासून 2023 पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा होती. आम्ही लहान असताना आम्हाला आजी-आजोबांनी सांगितलेलं, आमचं सगळं कुटुंब शेकापच होतं. स्वर्गीय वसंतदादा पवार आमचे थोरले काका पोटनिवडणुकीला उभे होते. तेव्हा पवारसाहेब विद्यार्थी होते. पवारसाहेबांनी तेव्हा विरोधात काम केलं”, असा खुलासा यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
पुढे त्यांनी सांगितलं की, 1967 ला साहेबांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली. इथे बसणाऱ्या प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांना घोलप साहेबांनी, मला पवार साहेबांनी पवार साहेबांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिलीय. 1978 ला पवार साहेबांनी पुलोदला आणून वसंतदादांच सरकार पाडलं. हा किस्सा अजित पवार यांनी सभेत सांगितला.
News Title : Ajit Pawar on Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते
अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर
देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्याने केली नम्रपणे विनंती
विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा
राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा
“मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत