‘चित्रा वाघ आधी रेवण्णा सेक्स स्कँडलवर बोला’; आदित्य ठाकरेंनी सुनावलं

Chitra Wagh | आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना आता जाहिरातीवरूनही रणकंदन होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) एका जाहिरातीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल केला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटले की, शिवसेना उबाठा गटाने महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली असा सवाल त्यांनी केला. याला आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर मी काही बोलणार नाही, त्यांना इतर नेते उत्तरं देतील. पण भाजपने आता प्रज्ज्वल रेवण्णावर बोलावं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

ज्या प्रज्ज्वल रेवण्णासाठी मोदींनी मतं मागितली त्याने इतकं नीच काम केलं. आपल्या देशातल्या महिला त्यामुळे सुरक्षित नाहीत. केंद्र सरकारमध्ये भाजप असताना त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णाला देशाबाहेर का जाऊ दिलं याचं उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्यावं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीये.

दरम्यान, महाराष्ट्रातून यावेळी जास्त काही बदल होणार नाही, गेल्या वेळच्या जागांपेक्षा एक-दोन जागा जास्त येतील किंवा कमी येतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाहांनी केलं होतं. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे. त्यांनी महाराष्ट्र विरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना आता राज्यातून एकही मत मिळणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या वयात साहेबांना सोडायला नको होतं’; काय म्हणाले अजित पवार?

‘थॅंक्स टू गद्दार लोक्स’; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

“भाजपला मतदान करा”; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शेकापचं अस्तित्व धोक्यात?; जयंत पाटलांमुळे पक्षाला गळती

“चित्राबाई पॉर्न बघत असतील, आक्रस्थळी बाईने…”, अंधारेंचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर