“भाजपला मतदान करा”; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Adhir Ranjan Chaudhary | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वच पक्ष आणि दिग्गज नेते प्रचारात व्यस्त आहेत. आपला पक्ष आणि उमेदवार कसा योग्य हे पटवून देण्यात नेते जुडले असताना काँग्रेस नेत्याने भाजपला मतदान करा, असं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते एका भाषणादरम्यान म्हणाले की, टीएमसी आणि भाजपला मतदान करणं ही एकच गोष्ट आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी आपलं विधान लगेच फिरवलं. आता कॉँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे इंडिया आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अधीर रंजन चौधरी भाजपची बी-टीम

काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी एकाच आघाडीत असलेल्या पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात असल्याने हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. अशात तृणमूलने अधीर रंजन यांना भाजपची बी-टीम म्हणत त्यांचा एक व्हीडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हीडीओमध्ये अधीर रंजन चौधरी यांनी सरळ तृणमूल काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान करण्याचं म्हटलं आहे.

इंडिया आघाडीत ‘बिघाडी’?

अधीर रंजन चौधरी यांचा एका सभेदरम्यान केलेल्या वक्तव्याचा व्हीडीओ तृणमूल काँग्रेसने आपल्या X अकाउंटवरुन टि्वट केला आहे. यात ते टीएमसीला मतदान करण्यापेक्षा भाजपला मतदान करा, असं म्हणत आहेत. त्यावर तृणमूल काँग्रेसची देखील प्रतिक्रिया आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागा वाटप न होण्यामागे अधीर रंजन चौधरीच जबाबदार असून ते बंगाल विरोधक आहेत. ते भाजपचे डोळे आणि कान म्हणून काम करत आहेत. तसेच भाजपचा प्रचार करत आहेत, असा आरोपच तृणमूल काँग्रेसने केला आहे.

या प्रकरणी कॉँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बंगालमध्ये भाजपच्या जागा कमी करणे हेच पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी टीएमसी ‘इंडिया’ आघाडीचा भाग असल्याची सारवासारव केली आहे.

News Title : Adhir Ranjan Chaudhary Video Viral

महत्त्वाच्या बातम्या-

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्यानी केली नम्रपणे विनंती

विद्यार्थ्यांनो… दहावीनंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी ‘या’ पर्यायांचा विचार करा

राजकारण तापलं; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला इशारा

भन्नाट फीचर्ससह ‘या’ कंपनीचा स्मार्टफोन लाँच; किंमत किती असणार