शेकापचं अस्तित्व धोक्यात?; जयंत पाटलांमुळे पक्षाला गळती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jayant Patil | रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती काही थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकामागे एक महत्वाचे असे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शेकापला सोडचिठ्ठी देत आहेत. माणगाव तालुक्याचे चिटणीस रमेश मोरे यांनी शेकापला सोडचिठ्ठी देवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

मुरूड तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्यावर नाराजी दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यात लागत असलेले धक्के थांबण्याचे नाव घेत नसून शेकापचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही मोठ्या प्रमाणात होती. अनेक वर्षे ताब्यात असलेली रायगड जिल्हा परिषद, मंत्री, आमदार, खासदार अशी अनेक महत्वाची पदे शेकापकडे होती. कालांतराने जिल्ह्यातील शेकापचे विद्यमान सर्वेसर्वा सरचिटणीस जयंतभाई पाटील पक्षाची सुत्रे स्वतःच्या हातात घेतली. त्यांनी आपल्या स्वतःच्या राजकीय कारकीर्दीसाठी अनेक तडजोडी केल्याचे पहावयास मिळाल्या. परंतू शेकापच्या दिवसेंदिवस होत असलेल्या नुकसानीकडे त्यांनी अक्षरशः दुर्लक्ष केले. त्यांच्या हातात सुत्रे आली तेव्हा पासून त्यांनी पक्ष अलिबाग-रायगड पुरताच मर्यादित ठेवला. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला. भाई जयंत पाटील यांनी आपल्या अपयशाचे खापर वेळोवेळी इतर पक्षाच्या नेत्यांवर फोडले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या अकार्यक्षमतेमुळे झालेला पराभव, मविआत न मिळालेले मंत्रीपद यामुळे असलेल्या नाराजीला जयंत पाटलांनी (Jayant Patil) “इतरांनी दगा दिला” असे नाव दिले. पक्षातील कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष, पक्षाची ध्येय-धोरणे नसणे, जनतेसोबतच नव्हे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी नसलेला संपर्क व संवादाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे सामान्य कार्यकर्ताच नाही तर पक्षाचे आमदार देखील पक्ष सोडून गेले आहेत.

आपल्या “मी पणा” या स्वभावामुळे की हुकूमशाही कारभारामुळे, कुणालाही विचारात न घेता स्वतःच्या मग्रुमीत राहून निर्णय घेणे तसेच, पक्षाची भूमिका, विचारसरणी सगळी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी गुंडाळून ठेवत आजपर्यंत
ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टोकाची भुमिका घेत विरोध करायचे आज त्यांच्याच गळ्यात गळे घातल्यामुळे अनेक जणांना त्यांची साथ सोडून इतर पक्षात प्रवेश करावा लागला आहे.

लोकांनी लोकांसाठी चालवेलेली चळवळ अशी ओळख असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला भाई जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वतःसाठी सुरू केलेली चळवळ कधी होवून गेली हा रायगडच्या इतिहासामध्ये संशोधनात्मक विषय राहील.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘नमाज पडणारे काही लोक दलाल आहेत’; ठाकरे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचा ताप वाढणार; कुठं पावसाचा इशारा तर कुठं उष्णतेची लाट कायम

वाद चिघळला; ‘हा’ नेता म्हणतोय… तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते

अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेताय? ‘या’ बड्या नेत्याने केली नम्रपणे विनंती