“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shardul Thakur | सध्या मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात रणजी ट्रॉफीतील दुसरा उपांत्य सामना खेळवला जात आहे. रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जात आहे, ज्यामध्ये शार्दुल ठाकूरने शानदार शतक झळकावले. ठाकूर नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 109 धावांची खेळी केली आणि मुंबईला तमिळनाडूविरुद्ध स्वस्तात बाद होण्यापासून वाचवले. मुंबईचा संघ अडचणीत असताना शार्दुलने अप्रतिम खेळी करत पाहुण्या संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

मुंबईचा संघ अडचणीत असताना ठाकूरने ही खेळी खेळली. मुंबईच्या संघाने अवघ्या 106 धावांत 7 गडी गमावले होते. पण त्यानंतर हार्दिक तमोरसह शार्दुल ठाकूरने संघाची धुरा सांभाळली आणि शानदार खेळी केली. या खेळीनंतर ठाकूरने एक मोठे विधान केले. बीसीसीआयने खेळाडूंची दुखापत टाळण्यासाठी हा निर्णय घ्यायला हवा असे जाणकारांचेही म्हणणे आहे.

शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत तामिळनाडूविरुद्ध शतक झळकावून मुंबईच्या संघाला लवकर सर्वबाद होण्यापासून वाचवले. या शानदार खेळीनंतर ठाकूरने रणजी ट्रॉफीच्या वेळापत्रकाशी संबंधित विधान केले. सध्या शार्दुलच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

शार्दुलचे झंझावाती शतक

शार्दुलने या सामन्यातील पहिल्या डावात 105 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. त्याने तमोरसोबत 105 धावांची भागीदारी नोंदवली. यानंतर त्याने तनुष कोटियनसोबत 79 धावा जोडल्या. मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर 104 षटकांत 9 गडी गमावून 353 धावा केल्या.

सामन्यानंतर बोलताना शार्दुलने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आपले मत मांडले. तो म्हणाला की, रणजी ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये अंतर असावे. खेळाडूंना विश्रांती मिळणे गरजेचे आहे. बीसीसीआयने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये अंतर ठेवायला हवे. एका सामन्यानंतर तीन दिवसांचे अंतर कमी आहे. कारण गॅप कमी असून नऊ सामने खेळल्यास खेळाडूला दुखापत होण्याची शक्यता वाढते.

Shardul Thakur ची मागणी

शार्दुल ठाकूरने या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये केवळ तीन-चार सामने खेळले आहेत. याआधी तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियासोबत होता. ठाकूरने संघाला उपांत्य फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रणजी ट्रॉफीचा चालू हंगाम 5 जानेवारीपासून सुरू झाला आहे. संपूर्ण हंगामातील सामन्यांमध्ये केवळ 3-4 दिवसांचे अंतर होते.

दरम्यान, बीसीसीआयने याकडे लक्ष द्यावे आणि सामन्यांमधील अंतर वाढवले ​​पाहिजे, असे ठाकूरचे म्हणणे आहे. या मोसमाचा अंतिम सामना 10 मार्च रोजी होणार आहे. म्हणजेच रणजी ट्रॉफीचा यंदाचा हंगाम जवळपास अडीच महिने चालणार असून यामध्ये एकूण 38 संघ सहभागी झाले आहेत. संपूर्ण हंगामात एकूण 138 सामने नियोजित आहेत.

News Title- Mumbai’s Shardul Thakur scores a century against Tamil Nadu in Ranji Trophy second semi-final match
महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

लोकसभेचे तिकिट मिळताच भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; खासदाराची पोलिसात धाव

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात