Lok Sabha Election | सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून सत्ताधारी भाजपने पहिल्या यादीत 195 उमेदवारांनी नावे जाहीर केली आहेत. अशातच तिकीट मिळताच उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराचा विदेशी महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले असून खासदाराने आरोप फेटाळले आहेत.
भाजप खासदार उपेंद्र सिंह रावत यांना पुन्हा तिकीट मिळाल्यानंतर 24 तासांतच एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खासदारांचे सचिव दिनेश रावत यांनी हा खासदारांची राजकीय प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. तसेच शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ बनावट आणि एडिट केलेला आहे, पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी रावत यांनी केली.
रावत यांची पोलिसात धाव
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे खासदारांच्या सचिवांचे म्हणणे आहे. व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या तारखांना हॉटेलच्या खोलीत महिला असल्याचे फुटेज आहे. पाच मिनिटे आणि एक सेकंदाची वेळ मर्यादा असलेल्या प्रत्येकी एकूण सात व्हिडीओ क्लिप आहेत.
खासदार उपेंद्र रावत म्हणाले की, व्हिडीओ एआयने संपादित केला आहे. हा एखाद्याचा 2022-23 चा व्हिडीओ असेल, ज्यामध्ये माझा चेहरा लावण्यात आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुमार मौर्य म्हणाले की, व्हिडीओ व्हायरल करणे हे खासदार उपेंद्र सिंह रावत यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र आहे. पुन्हा तिकीट मिळाल्याने विरोधक नाराज झाले आहेत. या षडयंत्राला जनताच उत्तर देईल.
Lok Sabha Election खासदाराचा व्हिडीओ व्हायरल
तीन मिनिटांपासून ते पाच मिनिटांपर्यंतचे अनेक व्हिडीओ सार्वजनिक करण्यात आले आहेत, ज्यात एक व्यक्ती एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव उपेंद्र रावत म्हणून प्रसिद्ध झाले आहे. रावत यांचा हा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी बाराबंकीमधून पुन्हा उमेदवार घोषित झाल्यानंतर 24 तासांच्या आत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, उपेंद्र रावत 2019 मध्ये बाराबंकी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हा भाजपने तत्कालीन खासदार प्रियांका सिंह रावत यांचे तिकीट रद्द करून उपेंद्र सिंह रावत यांना उमेदवारी दिली होती. आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
News Title- After getting ticket for Lok Sabha Election 2024, BJP MP from Uttar Pradesh’s Barabanki Upendra Singh Rawat’s obscene video with a woman has gone viral
महत्त्वाच्या बातम्या –
“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा
IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर
मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?
“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…