प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघाडी होऊ लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा समावेश आहे. यामधून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक वक्तव्य केलं आहे यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चर्चा केली जात आहे.

“कार्यक्रमाला बोलावलं तरीही जावू नये”

महाविकास आघाडीमध्ये अजूनही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप झाली नाही. भाजपची जागावाटप झाली तसेच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर प्रश्नचिन्ह आहे, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांना बोलावलं तरीही जाऊ नये, असं धक्कादायक वक्तव्य प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वंचित बहुजन आघाडीची युती महाविकास आघाडीसोबत पूर्ण झाली नाही. महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाला बोलावलं तर कोणीही जावू नये, असं आवाहन प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी देखील पुढील कार्यक्रमांना न जाण्याचं आवाहन वंचितच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव केली आहे.

आघाडीच्या नेत्यांकडून सारवासारव-

प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचे नेते जागे झाले. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. ते म्हणाले की, आंबेडकर यांनी केलेलं वक्तव्य मी ऐकलं आहे. प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते. आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी त्याकडे चुकीच्या अर्थाने पाहू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दीपक केसरकर काय म्हणाले?

दीपक केसरकर यांनी ही आंबेडकर यांची राज्यामध्ये ताकद असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या पक्षाला दिलेली वागणूक शोभादायक नाही. आंबेडकर नेहमीच तत्वांसाठी लढत असतात. त्यांनी काय निर्णय घ्यावा. कोणत्या आघाडीसोबत जावं हा त्यांचा निर्णय आहे, असं केसरकर म्हणाले.

News Title – Prakash Ambedkar News Update About Mahavikas Aghadi

महत्त्वाच्या बातम्या

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा