रोहित शर्माला वाढदिवसाला मिळालं मोठं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma Birthday | टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला केवळ देशातून नाहीतर जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Rohit Sharma Birthday) दिल्या जात आहेत. सोशल मीडियावर रोहितच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. रोहितला मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यात आलं. त्यावेळी चाहत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता रोहितच्या वाढदिवशी चाहते आनंद व्यक्त करत आहेत. (Rohit Sharma Birthday)

रोहितला रॅपच्या माध्यमातून शुभेच्छा (Rohit Sharma Birthday) देण्यात आल्या आहेत. रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रॅपचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई शहरात रॅप हे एक व्यक्त होण्याचं माध्यम मानलं जातं. रोहित शर्मा आधीपासून मुंबईचा रहिवासी होता आणि आजही आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या भाषेतून रॅपच्या माध्यमातून हीटमॅनला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितच्या फलंदाजीचे त्याच्या खेळीचे रॅपच्या माध्यमातून कौतुक करण्यात आलंय. (Rohit Sharma Birthday)

रोहित शर्माला रॅपच्या माध्यमातून शुभेच्छा

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

 

रोहित शर्माचे ऐतिहासिक रेकॉर्ड्स

रोहित शर्माला हिटमॅन असं नावाने संबोधलं जातं. हीटमॅन नावाने का संबोधलं जात हे आपल्याला माहितीच असेल. रोहित शर्माचे अनेक रेकॉर्ड आहेत. ते अद्यापही कोणत्याही खेळाडूला मोडता आले नाहीत.

2019 या वर्षात रोहितने वनडे विश्वचषकात 5 शतक ठोकले होते. त्याचा हा रेकॉर्ड अद्यापही कोणालाही मोडीत काढता आला नाही. न्यूझीलंड विरोधात उपांत्यफेरीचा सामना होता तेव्हा टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर पडली. श्रीलंकेचा माजी फलंदाज संगकारा आणि द. आफ्रिकेचा फलंदाज डिकॉकने चांगली कामगिरी करत 4-4 शतकं झळकवली.

तिन्ही फॉर्मध्ये रोहितने सर्वाधिक षटकार मारण्याचा बहुमान पटकवला आहे. कसोटी, वनडे आणि टी 20 फॉर्ममध्ये रोहितने आपल्या फलंदाजीतून सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने एकूण 472 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 597 षटकार मारले आहेत.

वनडे विश्वचषकात रोहित शर्माने तब्बल तीन वेळा द्विशतकी खेळी खेळली होती. ऑस्ट्रेलिया विरूद्ध द्विशतकी खेळी खेळली होती. तेव्हा 209 धावा केल्या होत्या. तर बरोबर दुसऱ्या वर्षी त्याने श्रीलंके विरूद्ध 264 धावा केल्या. त्यानंतर तीन वर्षानंतर मोहालीच्या मैदानावर 208 धावा करत द्विशतक केलं आहे.

सर्वोच्च धावसंख्येचा विचार केला तर रोहितच्या धावसंख्येचा आसपास कोणताही फलंदाज नाही. त्याने श्रीलंकाविरोधात 264 धावा केल्या होत्या. त्या धावांएवढी धावसंख्या कोणीही करू शकलं नसतं. सर्वाधिक चौकार मारण्यात रोहितने टीम इंडियाचे माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

श्रीलंकेविरूद्ध त्याने 264 धावा केल्या. त्याचसोबत त्याने याच सामन्यात 33 चौकार मारले आहेत. क्रिकेटमधील हा मोठा विक्रम आहे. या विक्रमाच्या बाबतीत रोहित अव्वल स्थानावर आहे. तर सचिन आणि वीरेंद्र सेहवागलाही रोहितने मागे टाकलं आहे. सचिन आणि सेहवागने एका डावात 25-25 चौकार मारले.

News Title – Rohit Sharma Birthday On Rap Song

महत्त्वाच्या बातम्या

“माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता..”

नीतू कपूरने सांगितली ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा, म्हणाल्या…

अजित पवारांना धक्का!; सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर सख्ख्या भावानेच घेतला आक्षेप

मुंबईकरांना झटका!; आदित्य ठाकरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘…तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही’; तटकरेंचा गीतेंना इशारा