‘…तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही’; तटकरेंचा गीतेंना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sunil Tatkare | सामाजिक सलोखा ज्यांना बघवत नाही ते धर्माधर्मांत, जातीजातींमध्ये मतांच्या बेगमीसाठी अंतर निर्माण करत आहेत. अयोध्येत राममंदिर झालं. त्याचसोबत अयोध्येत मशीदीचंही काम सुरू आहे, हे कधी ते लोक सांगत नाहीत मात्र मुस्लिम समाजाच्या मतांसाठी व्हॉटसअपच्या माध्यमातून मेसेज केले जातात. सामाजिक सामंजस्य जपणारे आम्ही आहोत परंतु कुणी कुणाच्या नावाने दंगा करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांचे धंदे काढायला मला वेळ लागणार नाही, असा इशारा खासदार सुनील तटकरेंनी अनंत गीतेंना (Sunil Tatkare) दिलाय.

रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाड शहरात प्रचंड उत्साहात महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी सुनील तटकरेंनी सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना तटकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

फाळणी होत असताना शेजारच्या देशात गेले त्यांना मातृभूमीत परत यायचे असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट शिथिल केली, हा सीएएचा कायदा आहे. या देशातील राष्ट्रभक्त मुस्लिमांमध्ये चुकीचं काही घडणार नाही. माझं आवाहन आहे उद्धव ठाकरे, अनंत गीते यांना की त्यांनी सीएए कायदा काय आहे हे जनतेला सांगावं. पण समाजासमाजात जाणीवपूर्वक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न ही जातीयवादी मंडळी करत आहे, असं सांगत तटकरेंनी (Sunil Tatkare) ठाकरे आणि गीतेंवर टीकास्त्र सोडलंय.

व्हॉटसअप मेसेजच्या निमित्ताने आमच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर या परिसरातील, देशातील, राज्यातील मुस्लिम समाजाने आमचा धर्मनिरपेक्ष विचार बघावा, असं आवाहनही तटकरेंनी केलं आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानता दिली. त्यामुळेच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था जिवंत आहे. देशामध्ये स्थैर्य आणि अस्थैर्य कसं होतं याचं उदाहरण देत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या या राजधानीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक हूंकार महाडच्या नगरीमधून दिला तिथे सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम होत आहे, असंही तटकरेंनी (Sunil Tatkare) म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आमच्या कॉलरमध्ये दम, म्हणूनच शरद पवार…’; उदयनराजे थेट बोलले

मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल- मुरलीधर मोहोळ

Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; किंमत ऐकून वेडे व्हाल

“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; राऊतांचा मोदींवर पलटवार

ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा!