मुंबईकरांना झटका!; आदित्य ठाकरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aditya Thackeray | मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकलनंतर बेस्ट बसेस मुंबईकरांचे जीवन सोपं बनवते. मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी लोकल ट्रेन पाठोपाठ बेस्ट बसेसचा वापर करतात. मात्र, आता बेस्टच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप हा बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ करुन मुंबईकरांचा खिसा कापायचा डाव आखत असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अशात आदित्य ठाकरेंची पोस्ट आता चर्चेत आली आहे.

आदित्य ठाकरेंची पोस्ट

एक्सवर (पूर्वीचे ट्वीट) आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी बेस्टच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याचा दावा केला आहे. ‘आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की, भाजप हा मुंबईविरोधी पक्ष आहे. त्यामुळेच भाजपने बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ करुन मुंबईकरांचा खिसा कापायचं ठरवलं आहे. अगोदरच बेस्ट बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच बस थांबण्याच्या थांब्यांचा वापर जाहिरातींचे फलक लावण्यासाठी केला जात आहे. कंत्राटदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.’, असं आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसंच पुढे त्यांनी म्हटलं की, आमच्या काळात आम्ही बेस्ट बसेसच्या तिकीटाचे दर परवडणारे ठेवले होते. बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करुनही जगात सर्वाधिक परवडणाऱ्या दरात आम्ही सेवा पुरवली. मात्र, भाजपच्या काळात तिकीटाचे हे दर वाढवले जात आहेत. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. राज्यात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही हा निर्णय बदलू, असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

आदित्य ठाकरेंकडून जोरदार प्रचार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महायुती तसंच महाविकास आघाडीकडून सध्या जोरदार प्रचार केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे राज्याच्या विविध भागांमध्ये फिरुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

त्यांनी नुकतीच कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये शाहू महाराज आणि सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आदित्य ठाकरे विरोधकांवर निशाणा साधत असतात.

News Title – best bus ticket price will be increase said Aditya Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

नेत्याच्या S E X स्कँडलने देश हादरला, व्हिडीओ व्हायरल… भाजपला फटका बसणार?

बीडमध्ये पंकजा मुंडे संकटात, या एका घटनेमुळे बजरंग सोनवणेंचं पारडं झालं जड

ग्राहकांसाठी आनंदवार्ता! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे रेट

“नकली शिवसेना म्हणायला ती काय मोदीजी तुमची डिग्री आहे का?”

पतंजलीला मोठा झटका, ही उत्पादनं वापरत असाल तर काळजी घ्या!