नेत्याच्या S E X स्कँडलने देश हादरला, व्हिडीओ व्हायरल… भाजपला फटका बसणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prajwal Revanna Sex Scandal | कर्नाटकातल्या एका सेक्स स्कँडलमुळे (Prajwal Revanna Sex Scandal) देश हादरला आहे. देशाचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवावर सेक्स स्कँडलचा आरोप करण्यात आला आहे. प्रज्वल रेवन्ना यांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जनता दल सेक्युलर हा भाजपचा घटक पक्ष आहे. यामुळे आता भाजपवर देखील टीका होऊ लागली आहे.

प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलमुळे भाजप अडचणीत?

रेवन्ना यांच्यावर मोलकरणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र यामुळे भाजपच्या डेकेदुखीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. कारण जनता दल सेक्युलर हा भाजपचा घटक पक्ष असून एका बाजूला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची शिकवण देणारं भाजप सरकार अशा पक्षांना आपल्यात सामावून घेत आहे. यामुळे विरोधक भाजपवर टीका करताना दिसत आहेत.

जनता दल सेक्युलर या पक्षावर केवळ कर्नाटक राज्याचं नाहीतर देशातून टीका होतेय. यामुळे भाजपवर देखील टीका होऊ लागलीये. नुकतीच उद्धव ठाकरे यांची एक सभा झाली त्यासभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला. सेक्स स्कँडल श्(Prajwal Revanna Sex Scandal) करणाऱ्यांना तुम्ही सोबत घेता. अशांना तुम्हाला मत द्यायचं आहे का?, असा सवाल त्यांनी केला. (Prajwal Revanna Sex Scandal)

कर्नाटक महिला आयोगाचा धक्कादायक दावा

हासन जिल्ह्यातील होलेनरासीपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हे राज्यातील सर्वात मोठं सेक्स स्कँडेल असल्याचं कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांना म्हटलंय. याप्रकरणाची चौकशी करण्याबाबत सिद्धरामय्या सरकारने  सहाय्यक पोलिस महानिरीक्षक बी. के. सिंह. यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केलीये. प्रज्वल यांचा जडीएस पक्षाची कर्नाटकमध्ये भाजपसोबत युती आहे. मात्रा याचा परिणाम हा भाजपवर अनेक स्तरातून होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीये. (Prajwal Revanna Sex Scandal)

33 वर्षीय प्रज्वल या निवडणुकीत दुसऱ्यांदा हसन मतदारसंघातून जेडीएसचे उमेदवार आहेत. सध्या प्रज्वल रेवन्ना हे सेक्स स्कँडलमुळे चांगलेच कचाट्यात सापडले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. याचा भाजपवर मतदानाचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी काँग्रेस नेते आणि बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांचा देखील एक न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा देखील न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आता भाजपचा घटकपक्ष असलेला जनता दल सेक्युलर पक्षाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना हे अडचणीत सापडले आहेत.

News Title – Prajwal Revanna Sex Scandal Matter Impact On BJP

महत्त्वाच्या बातम्या