‘आमच्या कॉलरमध्ये दम, म्हणूनच शरद पवार…’; उदयनराजे थेट बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Udayanaraje Bhosale | सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांना राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचं आव्हान आहे. कधीकाळी शरद पवारांचे शिलेदार असणारे हे दोन नेते आता लोकसभेला एकमेकांविरोधात लढत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच उदयनराजे भोसले यांनी एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यासोबतच त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉलर उडवली होती. त्यानंतर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही कॉलर उडवली.

शरद पवार यांनी कॉलर उडवून माझी नक्कल केली

उदयनराजे यांनी कॉलर उडवल्यानंतर त्यांनी सकाळी उडवली की संध्याकाळी, असा सवाल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. आव्हाड यांच्या या टीकेचा उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला आहे.

“माझ्या कॉलरवर त्यांचं प्रेम आहे. त्यांनी कॉलर उडवून मला आताच निवडून दिलं पाहिजे, असे संकेत दिले आहेत. तसेच कॉलर सकाळी उडवतो की संध्याकाळी… कॉलर, कॉलर आहे. शर्टला कॉलर आहे, कुर्ता, पायजमाला कॉलर आहेच ना?”, असा टोला उदयनराजे (Udayanaraje Bhosale ) यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.

महाविकास नव्हे ‘महाभकास’ आघाडी

तसंच पुढे ते म्हणाले की, शरद पवार यांनी कॉलर उडवून माझी नक्कल केली. चांगलं आहे ना? उदयनराजे करेक्ट वागतात. माझं अनुकरण शरद पवार करतात. आमच्या कॉलरमध्ये दम आहे. माझ्या कॉलरमध्ये दम नसता तर त्यांनी अनुकरण केलं नसतं, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

यावेळी उदयनराजे यांनी महाविकास आघाडीवर देखील टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची तुलना होऊच शकत नाही. मोदींचा पक्ष राष्ट्रीय आहे. तर शरद पवार यांचा पक्ष प्रादेशिक आहे. मोदी म्हणजे स्थिरता. मविआ आघाडीतच स्थिरता नाही. त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे ही निवडणूक डळमळीत आहे. महाविकास आघाडी नाही, ही तर महाभकास आघाडी आहे”, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे.

News Title : Udayanaraje Bhosale on sharad pawar 

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नागरिकांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच! अन्यथा हॉस्पिटलमध्ये मोजावे लागतील पैसे

‘अभिषेक बच्चनने माझ्यासोबत सेटवर…’, प्रियंका चोप्राने केला गौप्यस्फोट

नेत्याच्या S E X स्कँडलने देश हादरला, व्हिडीओ व्हायरल… भाजपला फटका बसणार?

बीडमध्ये पंकजा मुंडे संकटात, या एका घटनेमुळे बजरंग सोनवणेंचं पारडं झालं जड