पुण्याच्या ‘या’ रील स्टारसोबत राज ठाकरेंचं पहिलं रील, व्हिडीओ तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Atharva Sudame | सोशल मीडियावर रिल्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेकजण इंस्टाग्रामवर रील करत फेमस होत असताना पहायला मिळत आहेत. दरम्यान सध्या पुण्यात अनेकजण रील करत असतात, त्यामध्ये जोरदार चर्चा आहे ती रील स्टार अथर्व सुदामेची. पुणेकरांच्या शैलीत मजेशीर व्हिडीओ बनवून अथर्वने लाखो तरुणांच्या मनात घर केलं आहे. एवढंच नाही तर, काही महिन्यांनपूर्वी अथर्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला गेला असताना स्वतः राज ठाकरेंनी त्याला मंचावर बोलवून मी तुझे सगळे व्हिडीओ पाहतो, असं सांगत अथर्वचं कौतूक केलं होतं. दरम्यान सध्या चर्चा होत आहे ती अथर्वच्या नव्या व्हिडीओची…

काय आहे प्रकरण?

पुण्याचा अथर्व सुदामेने (Atharva Sudame) गेल्या काही दिवसांमध्ये इंस्टाग्रामवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. स्थळ पुणे या विषयावर अथर्व रोज विनोदी व्हिडीओ बनवत असतो. सोशल मीडियावर अथर्वची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. अथर्वने काही दिवसांपूर्वी आशा भोसले यांच्यासोबत आपल्या अधिकृत अकाउंटवर रील बनवली होती. आता अथर्वने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्ताने एक रील बनवली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

व्हायरल होत असलेल्या रीलमध्ये राज ठाकरे यांनी एक संदेश दिला आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं, ते त्यांनी त्यांच्या परीने जे करायचं होतं ते केलं. पण आता अपण काय करत आहोत?, ते महत्त्वाचं आहे. पुढे ते म्हणाले की, आज आपण या महाराष्ट्र दिनानिमित्त काय करणार आहोत? ज्यामुळे महाराष्ट्र पुढे जाईल याचा विचार होणं गरजेचं आहे.”

मराठी भाषा बोलली पाहिजे-

राज ठाकरे पुढे असं देखील म्हणाले की, “मराठी भाषा बोलली पाहिजे, मराठी भाषा रुजवली पाहिजे.” व्हायरल होत असलेल्या रील खाली अर्थवचे चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत त्याचं कौतुक करत आहेत.

News Title : Atharva Sudame makes video with raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

कोल्हेंना प्रश्नावर प्रश्न, त्याच गावात आढळरावांना लोकशाही मार्गाने प्रश्न विचारायला बंदी

…त्यांची लायकी नाही!, धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार भडकले, Video तुफान Viral

दक्षिण मुंबईत भाजपचा पत्ता कट, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळालं लोकसभेचं तिकीट

“उज्ज्वल निकम यांना जेलमध्ये पाठवायला हवं…”; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

‘कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’; मोदींचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल