“उज्ज्वल निकम यांना जेलमध्ये पाठवायला हवं…”; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Mane Viral Post | मराठी अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने हे त्यांच्या स्टाईलने सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. ते नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर आक्रमक होताना दिसत आहेत. आता किरण माने यांनी (Kiran Mane Viral Post) थेट वकील आणि भाजपचे उमेदवार उज्ज्वल यांच्यावर टीका केलीये. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत उज्ज्वल निकम यांना जेलमध्ये पाठवण्याबाबत पोस्ट केलीये. ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. (Kiran Mane Viral Post)

उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. विद्यमान खासदार पुनम महाजन यांना डावलून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलीये. आतापर्यंत उज्ज्वल निकम यांनी राजकारणापासून लांब राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. निकम यांच्याविरोधात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. यावर आता किरण माने यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर फेसबुकवर एक पोस्ट करून हल्लाबोल चढवला आहे.

“उज्ज्वल निकम यांना लोकसभेत न पाठवता जेलमध्ये पाठवायला हवं”

“उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठवता जेलमध्ये पाठवायला हवं.” असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले! का म्हणाले असतील? पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भिक नाही मागीतली. त्यांनी एक पुस्तक लिहीलं… ‘करकरेंना का व कोणी मारले?
त्यानंतर ते म्हणाले की, “पुस्तकात त्यांनी काही सिक्रेटस् ओपन केली आहेत. मुश्रीफसाहेब म्हणतात, : “पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली आहे, याची डिटेल माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला १९ नोव्हेंबर २००८ रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. पुढील कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळवली नाही आणि हा हल्ला होऊ दिला.”
प्रभाकर अलोक यांच्या मनात नक्की काहीतरी कपट होतं. यात शेकडो निरपराध लोकांचे बळी गेले… तितकेच लोक जन्मभरासाठी अपंग झाले. त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही, कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते… का??? तर उज्जवल निकम यांना माहीत होते की प्रभाकर अलोक हे आर्.एस्.एस्. च्या आतल्या गोटातले आहेत !”

“उज्ज्वल निकम यांना तपास करता आला नाही”

पुढे ते सांगतात, : “हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिध्द झाले होते (मुंबई सेशन्स कोर्ट निकालपत्र पान नं. ९२०). त्याशिवाय करकरेंच्या पोस्ट मार्टेममध्ये स्पष्ट झाले होते की, त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हाॅलव्हरने पाच गोळ्या मारल्या होत्या. त्यामुळे रिव्हाॅलव्हरने गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते. पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही… कारण त्यांना माहीत होते की, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याने हे कृत्य केले आहे…आणि गोविलकर हा आर.एस.एस.शी संबंधीत आहे.” (Kiran Mane Viral Post)
आता ही ट्रोल्स पिलावळ मुश्रीफ यांनाही म्हणेल की “उज्जवल निकमांवर आरोप करायची तुझी लायकी आहे का?” या भक्तपिलावळीला फक्त भुंकायला सोडलंय हो. ‘छ्छू’ म्हटलं की सुटायचं. पण माझ्या भावांनो, आपल्या धडावर आपलंच डोकं आहे ना? विचार करा. बास एवढंच.”, अशी पोस्ट किरण माने यांनी केली. (Kiran Mane Viral Post)

News Title – Kiran Mane Viral Post About Ujjwal Nikam Loksabha Candidacy