‘कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’; मोदींचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | लोकसभा निवडणुकीमुळे देशासह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी थेट पंतप्रधान मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर आणि पुण्यात भव्य सभा घेतली. तर, आज त्यांनी माढा येथे सभा घेतली.

पुण्यात झालेल्या सभेत मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आज दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला. पुण्यातील सभेत शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केल्यानंतर आज (30 एप्रिल) माढ्यात मोदींनी पुन्हा टीकेचे बाण सोडले आहेत.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“15 वर्षांपूर्वी माढामध्ये एक नेता निवडणूक लढण्यासाठी आला होता. त्यावेळचे लोक सांगतात की, या बड्या नेत्याने तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने माढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देण्याची शपथ घेतली होती. त्यांनी पाणी पोहचवलं आहे का? तर नाही. तुम्हाला हे लक्षात आहे ना? त्यांनी वचन दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.”, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

तसंच पुढे ते म्हणाले की, येथील मातब्बर नेते देशाचे कृषीमंत्री होते. तेव्हा ऊसाच्या एफआरपीचा दर 200 रुपये इतका होता. मात्र, आज मोदी सरकारच्या काळात उसाचा एफआरपी प्रतिक्विंटल 340 रुपये इतका आहे. हा मातब्बर नेता कृषीमंत्री होता तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकलेल्या बिलांचे पैसे मिळवण्यासाठी साखर आयोगाच्या कार्यालयात खेटे मारायला लागायचे. आज देशात ऊसाचा थकित एफआरपी 100 टक्के दिला जातो, असं मोदी (Narendra Modi) यांनी सांगितलं.

कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?

विदर्भ, मराठवाड्याला थेंब थेंब पाण्यासाठी तडफडवण्याचं पाप काँग्रेसच्या लोकांनी आणि काही नेत्यांनी केलं. साठ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीही पोहचवू शकलं नाही. अनेक सिंचन प्रकल्प रखडले होते. त्यातले 26 प्रकल्प महाराष्ट्रातले होते. 2014 मध्ये इथे सत्ता आल्यानंतर आम्ही यावर काम केलं, असं म्हणत मोदी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात नव्वदीच्या दशकापासून प्राप्तिकरामुळे साखर कारखाने त्रस्त होते.कृषीमंत्री असताना 2014 पूर्वी शरद पवारांनी ही समस्या सोडवली नाही. आमचं सरकार आल्यावर आम्ही ही समस्या दूर केली.आम्ही साखर कारखान्यांना 10 हजार कोटींचा दिलासा देऊन जुना प्राप्तीकर माफ केला, असा दावा देखील पंतप्रधान मोदी यांनी केला.

News Title :  Narendra Modi criticizes Sharad Pawar in Madha constituency

महत्त्वाच्या बातम्या-

‘आमच्या कॉलरमध्ये दम, म्हणूनच शरद पवार…’; उदयनराजे थेट बोलले

मोदींच्या नेतृत्वात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल- मुरलीधर मोहोळ

Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; किंमत ऐकून वेडे व्हाल

“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; राऊतांचा मोदींवर पलटवार

ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा!