…त्यांची लायकी नाही!, धनंजय मुंडेंचं नाव काढताच शरद पवार भडकले, Video तुफान Viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खासदार शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्याचा संदर्भ देत पत्रकारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) यावर प्रश्न विचारले. यावेळी उत्तर देताना शरद पवारांनी धनंजय मुंडेंची थेट लायकीच काढलीये. शरद पवार (Sharad Pawar) यांना राग अनावर झाला. यावेळी शरद पवार यांनी तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं त्यांची बोलण्याची लायकी नाही, असा पलटवार (Sharad Pawar) केला.

शरद पवार यांनी धनंजय मुंडे (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यावर जास्त बोलणं टाळलं. मात्र पत्रकारांनी प्रश्न विचारताच शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

पुरंदरच्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका होती. आपल्या घरात आलेल्या सुनेला आपण लेक मानतो. या शिकवणीचा या निवडणुकीत फरक पडायला लागला आहे. या निवडणुकीत एखाद्या देशाचं भवितव्य ठरवायचं आहे. एखाद्या कुटुंबाचं भवितव्य ठरवायचं नाही, असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला. तर नुकतीच इंदापूर येथे देखील महायुतीची प्रचार सभा पार पडली. तेव्हा धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना अजित पवार यांना व्हिलन करायचं होतं, असं म्हटलेलं.

याच मुद्द्यावरून पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. मात्र प्रत्येक वेळी संयमाने उत्तर देणारे शरद पवार यावेळी संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. शरद पवार यांनी रागाच्याभरात धनंजय मुंडे यांची लायकी काढली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

अजिबात उत्तर देणार नाही मी. ज्यांचं नाव तुम्ही घेता त्यांची लायकी नाही. त्यांना कशाकशातून बाहेर काढलंय याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग मी सध्या बोलू इच्छित नाही. त्यांना लहान कुटुंबातला, समाजातला, उद्योन्मुख तरूण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली. असं असुनसुद्धा ते आता माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागले. कुटुंबावर हल्ले करावे लागले. त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही. आज शेवटचा उल्लेख माझ्याकडून होईल, असं शरद पवार म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी शरद पवार यांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांच्यावर टीका होत असल्याचं पाहायला मिळतंय.

News Title – Sharad Pawar Aggressive On Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या

“उज्ज्वल निकम यांना जेलमध्ये पाठवायला हवं…”; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

‘कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’; मोदींचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल

“माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता..”

नीतू कपूरने सांगितली ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा, म्हणाल्या…

अजित पवारांना धक्का!; सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर सख्ख्या भावानेच घेतला आक्षेप