Shirur, Pune l शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या समोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao) यांचं आव्हान आहे, मात्र आता सत्तेचा गैरवापर करुन शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोल्हेंना सवाल, आढळरावांसाठी सत्तेचा वापर-
करंदी हे शिरुर लोकसभा (Shirur) मतदारसंघातील एक महत्त्वाचं गाव आहे. या गावात काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांना अडचणीत आणणारे प्रश्न काही तरुणांनी विचारले होते. कोल्हेंना प्रश्न विचारणारे सारे तरुण आढळरावांचे कार्यकर्ते असल्याचं नंतर समोर आलं होतं. या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप नंतर चांगलीच व्हायरल झाली होती. आता याच गावात अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांची मात्र मुस्कटदाबी झाल्याचे आरोप समोर आले आहेत.
करंदी गावात आढळराव (Shivajirao Adhalrao) पाटलांची आज (दि. ३०) रोजी सभा होती, मात्र या सभेच्या आधी अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे सभेच्या ठिकाणी जाऊ नका नाहीतर पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते बबन ढोकले यांनी केला आहे.
लोकशाही मार्गानं प्रश्न विचारायला बंदी-
खासदार अमोल कोल्हे करंदी गावात आले, त्यावेळी आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना लोकशाही मार्गाने प्रश्न विचारण्याची मुभा दिली गेली होती, दुसरीकडे मात्र आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao) गावात आल्यावर लोकांना लोकशाही मार्गाने प्रश्न विचारण्याची मुभा दिली गेली नाही. सत्तेचा वापर करुन लोकांना दडपून टाकण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
करंदी गावात सत्तेच्या या गैरवापराबद्दल तीव्र शब्दात निषेध उमटताना दिसत आहे. लोकांच्या मनात आढळराव पाटील यांच्या विरोधात वातावरण तयार होताना दिसत आहे. येत्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao) यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया करंदीच्या ग्रामस्थांनी दिली आहे.
दुसरीकडे शिरुर लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांचं वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेतून शिंदे यांच्यासोबत गेल्यानं आढळराव आधीच अडचणीत होते, त्यात त्यांनी शिंदे गटाला ही जागा न सुटल्यानं अजित पवार गटात प्रवेश केला आणि लोकसभेचं तिकीट घेतलं. ज्या राष्ट्रवादीवर आयुष्यभर टीका केली त्याच राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याची नामुष्की आढळराव पाटील यांच्यावर आली आहे. सध्या वातावरण तर आढळराव पाटील यांच्या विरोधात दिसत आहे, त्यामुळे निकाल काय लागणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण मुंबईत भाजपचा पत्ता कट, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळालं लोकसभेचं तिकीट
“उज्ज्वल निकम यांना जेलमध्ये पाठवायला हवं…”; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल
‘कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’; मोदींचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल
“माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता..”
नीतू कपूरने सांगितली ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा, म्हणाल्या…