Malaika Arora | बाॅलिवूडमधील कायम सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. मलायका सतत आपल्या बोल्ड आणि हाॅट लूकने पापराझींच्या कॅमेरामध्ये कैद होत असताना दिसत असते. एवढंच नाहीतर आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहते. यामुळे अनेकवेळा मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असतं. सोशल मीडियावर मलायकाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सगळीकडे तूफान व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकारण?
काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रात्री अचानक मलायका (Malaika Arora) एक्स पती अरबाज खानच्या घरी पोहोचली होती. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला. घटस्फोटानंतरही मलायका अरबाजच्या घरी का केली? असे अनेक प्रश्न नेटकरी कमेंट्स करत विचारत होते. एवढंच नाही तर मलायकासोबत तिचा मुलगा अरहान खान देखील पोहोचला होता. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली होती.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ-
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये मलायका (Malaika Arora) अरबाजच्या घरा खाली असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, मलायकाला बघून पापाराझींनी एकाच वेळी गर्दी केली. मात्र, कायम पापाराझींना पोझ देत असलेल्या मलायकाने यावेळी पापाराझींना चक्क इग्नोर केलं. मलायकाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, ‘सर्व ठिक तर आहे ना?’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मलायका… इतकी घाई अखेर कोणत्या गोष्टीची..’, मात्र, सध्या चर्चा आहे ‘अरबाज याला स्वतःच्या लग्नाची पत्रिका द्यायला पोहोचली का?’ या कमेंटची.
मलायकाने प्रतिक्रिया दिली नाही-
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हि़डीओवर मलायकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आपल्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात.
News Title : Malaika Arora seen arbaaz khan
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण मुंबईत भाजपचा पत्ता कट, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळालं लोकसभेचं तिकीट
“उज्ज्वल निकम यांना जेलमध्ये पाठवायला हवं…”; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल
‘कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’; मोदींचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल
“माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता..”
नीतू कपूरने सांगितली ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा, म्हणाल्या…