लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Train Accident | मागील वर्षी 29 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली होती. या अपघातात सुमारे 14 जणांना जीव गमवावा लागला. त्यावेळी हा अपघात अधिकाऱ्यांच्या काही चुकांमुळे झाला, अशी माहिती समोर आली होती. मात्र, आता एक मोठा खुलासा झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दावा केला आहे की, जेव्हा दोन ट्रेनची टक्कर झाली तेव्हा ट्रेनचा लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट मोबाईल फोनवर क्रिकेट मॅच पाहत होते.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता रायगडा पॅसेंजर ट्रेनने आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम पलासा ट्रेनला पाठीमागून धडक दिली, त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 14 लोक ठार आणि 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.

क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात

भारतीय रेल्वे ज्या नवीन सुरक्षा उपायांवर काम करत आहे त्याबद्दल बोलताना वैष्णव यांनी आंध्रप्रदेशातील रेल्वे अपघाताचा उल्लेख केला. रेल्वेमंत्री म्हणाले की, क्रिकेट सामन्यामुळे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट दोघेही विचलित झाल्याची घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली. आम्ही आता अशा प्रणाली स्थापित करत आहोत जे अशा कोणत्याही विचलितांना शोधू शकतील आणि पायलट पूर्णपणे गाडी चालवण्यावर केंद्रित आहेत याची खात्री करू शकतील.

तसेच आम्ही सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ती पुन्हा घडू नये. आंध्रप्रदेशात जी घटना घडली त्याच्या तळाशी जाण्यात आम्हाला यश आले. लोको पायलट क्रिकेटचा सामना पाहत राहिल्याने त्यांचे दुर्लक्ष झाले अन् मोठा अपघात झाला, असे अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले.

Train Accident अन् मोठा खुलासा

रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा तपास अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. या घटनेच्या एका दिवसानंतर, प्राथमिक रेल्वे तपासात असे म्हटले होते की, रायगडा पॅसेंजर ट्रेनचे लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट रेल्वे अपघातास जबाबदार आहेत, ज्यांनी दोषपूर्ण स्वयंचलित सिग्नलिंग सिस्टमसाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले. खरं तर या अपघातात दोन्ही क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

दरम्यान, रायगडा पॅसेंजर ट्रेनने आंध्र प्रदेशातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशात हा अपघात घडला कारण लोको पायलट आणि सह पायलट दोघेही क्रिकेट सामन्यामुळे विचलित झाले होते.

News Title- andhra pradesh train accident 2023 railway minister ashwini vaishnaw has made a big revelation

महत्त्वाच्या बातम्या –

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा

युझी चहलचा संगीता फोगाटसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांनी घेतली शाळा!

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; 34 मंत्र्यांना उमेदवारी, गडकरींचे नाव प्रतीक्षेत