Nitin Gadkari | लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सर्वप्रथम उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. आता सत्ताधारी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली असून १९५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावं वाचून दाखवली.
भाजपच्या पहिल्या यादीत 34 मंत्र्यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नव्हते. खरं तर भाजपने राज्यातील एकाही जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षासोबत भाजप महायुतीत लढणार आहे. त्यामुळे अद्याप लोकसभेचे जागावाटप ठरले नसल्याचे कळते.
34 मंत्र्यांना उमेदवारी
गुरुवारी रात्री केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत नावांवर विचारमंथन झाल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली. सस्पेंस संपवत शनिवारी भाजपने नावे जाहीर केली. या निवडणुकीत भाजपने मोठे सरप्राईज दिले आहे. भाजपच्या पहिल्या यादीतील विशेष बाब म्हणजे 50 वर्षांखालील 47 उमेदवार रिंगणात आहेत. ओबीसी उमेदवारांची संख्या 57 आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून तर गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून तिकीट देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर केले नाही. पण, भाजपने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 2019 मध्ये भाजपने एकूण 303 जागा जिंकल्या होत्या.
Nitin Gadkari यांचे नाव प्रतीक्षेत
भाजपने शनिवारी उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24 आणि गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. याशिवाय केरळमधील 12 जागांसाठी, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड आणि झारखंडमधील प्रत्येकी 11 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
तसेच भाजपने दिल्लीतील 5, उत्तराखंडमधील 3 आणि जम्मू-काश्मीरमधील 2 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार आणि दमण आणि दीवमधील प्रत्येकी एका जागेसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
News Title- BJP Lok Sabha Candidate List 34 Ministers got nomination and Nitin Gadkari’s name was not in the first list
महत्त्वाच्या बातम्या –
लोकसभेसाठी महाराष्ट्राच्या माजी गृहराज्यमंत्र्यांना उमेदवारी; भाजपने आखली रणनीती
क्रिकेटपटू युवराज सिंहची राजकारणात एंट्री?, स्वतःच केला खुलासा
लोकसभेच्या तिकिटासाठी महाराष्ट्रातील 1 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?
मोठी बातमी! सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वाराणसी’तून लढणार
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राचा उमेदवार, मात्र उत्तर प्रदेशातून लढणार!