युझी चहलचा संगीता फोगाटसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांनी घेतली शाळा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल नाना कारणांनी चर्चेत असतो. तो त्याच्या अनोख्या शैलीमुळे नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. आता चहलचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये त्याला महिला पैलवान संगीता फोगाटने खांद्यावर घेतल्याचे दिसते. ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोच्या पार्टीदरम्यान भारतीय महिला कुस्तीपटू संगीता फोगाट टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन त्याची फिरकी घेताना दिसली.

या हंगामात संगीता फोगाट आणि चहलची पत्नी धनश्री वर्मा यांनीही या शोमध्ये भाग घेतला होता. संगीता आधीच शोमधून बाहेर झाली आहे. त्याचबरोबर टॉप-5 मध्ये स्थान मिळवण्यात धनश्री वर्माला यश आले. शो दरम्यान, चहलने आपल्या पत्नीला सोशल मीडियाद्वारे खूप पाठिंबा दिला आणि चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले.

संगीता फोगाट ऑन फायर

खरं तर अंतिम भागाचे चित्रीकरण झाले असून तो 2 आणि 3 मार्च रोजी प्रसारित होत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मनीषा राणीने ट्रॉफी जिंकली आहे. अशाप्रकारे धनश्रीला फायनल जिंकण्यात अपयश आले आहे. शनिवारी झलक दिखला जा स्टार्ससाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये चाहत्यांना युझवेंद्र चहलची अनोखी झलक पाहायला मिळाली. यामध्ये संगीता फोगाट चहलला खांद्यावर घेऊन गोल गोल फिरताना दिसत आहे. काही वेळाने तिने चहलला खाली घेतले तेव्हा गोलंदाजाला चक्कर येत होती.

 

33 वर्षीय चहल बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. मात्र, त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर चहलला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन डे संघात स्थान मिळवण्यात यश आले, पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही.

 

Yuzvendra Chahal चा व्हिडीओ व्हायरल

आता चहल थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. तो आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसेल, ज्यामध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. राजस्थानचा 17 व्या मोसमातील पहिला सामना 24 मार्च रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीग 2024 लवकरच सुरू होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. युझवेंद्र चहलचीही नजर या वर्षी जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वचषक 2024 वर असेल. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतही चहलला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.

 

News Title- A video of Team India player Yuzvendra Chahal with wrestler Sangeeta Phogat at the Jhalak Dikhhla Jacha party is going viral

महत्त्वाच्या बातम्या –

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; 34 मंत्र्यांना उमेदवारी, गडकरींचे नाव प्रतीक्षेत

लोकसभेसाठी महाराष्ट्राच्या माजी गृहराज्यमंत्र्यांना उमेदवारी; भाजपने आखली रणनीती

क्रिकेटपटू युवराज सिंहची राजकारणात एंट्री?, स्वतःच केला खुलासा

लोकसभेच्या तिकिटासाठी महाराष्ट्रातील 1 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

मोठी बातमी! सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वाराणसी’तून लढणार