लोकसभेच्या तिकिटासाठी महाराष्ट्रातील 1 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होण्यापूर्वीच भाजपने (BJP) मोठा धमाका केला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार?

भाजपच्या (BJP) पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्रातील एकाही लोकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. अशात सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या उमेदवार यादीकडे लागलं आहे. याआधी महाराष्ट्रातील एक खासदार भाजप (BJP) मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून अपक्ष खासदार नवनीत राणा आहे.

नवनीत राणा BJP मध्ये जाणार?

नवनीत राणा या भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लोकसभेच्या तिकिटासाठी नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्यावर नवनीत राणा मोठा निर्णय घेऊ शकतात असं सांगितलं जात आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल रवी राणा यांना करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजून चर्चा झाली नाही. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग्य वेळी करेक्ट सिग्नल येईल तेव्हा सकारात्मक निर्णय कसा घ्यायचा त्यावर आम्ही विचार करू. सध्या महायुतीचे घटक म्हणून ताकदीने काम करू, असं सूचक वक्तव्य नवनीत रवी राणा यांनी केलंय.

तुम्ही बांधाल तेच आमचे तोरण, तुम्ही ठरवाल तेच आमचे धोरण, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण आम्ही फक्त राणा समर्थक आहोत, अशी नवनीत राणा समर्थकांनी पोस्ट व्हायरल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राचा उमेदवार, मात्र उत्तर प्रदेशातून लढणार!

भाजपकडून चंद्रकांत पाटलांना लोकसभेची उमेदवारी, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?

एकाच दिवशी भाजपला सलग दोन मोठे झटके!

‘या’ तीन कामानंतर अंघोळ करणं आवश्यक, अन्यथा…

देशात खळबळ! राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी